शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चो:यांमुळे नागरिक त्रस्त, पोलीस सुस्त

By admin | Updated: February 7, 2017 00:45 IST

धडक कारवाईची अपेक्षा : दर दोन दिवसाआड एक चोरी, नागरिकांनाच घालावी लागतेय गस्त

नंदुरबार : पोलीस सुस्त, जनता त्रस्त अशी स्थिती वारंवारच्या घरफोडय़ा व चो:यांमुळे शहरवासीयांची झाली आहे. काही भागातील नागरिकांनी स्वत:च गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे. एकप्रकारे हा शहर पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब असल्याचेच बोलले जात आहे. दरम्यान, सोमवारी उत्तर रात्री जगतापवाडी भागात पुन्हा एक घर फोडल्याची घटना घडली.गेल्या दोन महिन्यांपासून घरफोडी, भुरटय़ा चो:या यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. झालेल्या घटनांमधील तपासही रेंगाळला आहे. एकाही घटनेतील आरोपीला पकडण्यात किंवा चो:या उघडकीस आणण्यात शहर पोलिसांना यश आलेले नाही. याबाबत आता वरिष्ठ पोलीस अधिका:यांनीच दखल घेणे आवश्यक आहे.दोन महिन्यात 20 घटना गेल्या दोन महिन्यात 20 पेक्षा अधिक चोरीच्या घटना शहरात घडल्या आहेत. त्यात उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना वेगळ्याच आहेत. अर्थात दर दोन दिवसाआड एक चोरी अशी सरासरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. काही घटनांची नोंद होत आहे, तर काही घटनांमध्ये विनाकारण पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा नको म्हणून नागरिक नोंदच करीत नसल्याचे चित्र आहे. चोरीच्या प्रकारांमध्ये घरफोडी, मोटरसायकल चोरी, यासह घराच्या परिसरातून विद्युत मोटार चोरी आणि इतर घटनांचा समावेश आहे. धाकच उरला नाहीशहरात पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे चित्र आहे. रात्रीची आणि दिवसाची गस्तदेखील कमी झाली आहे. गुन्हे उघडकीस आणणारे पथकदेखील निष्क्रिय ठरले आहे. त्यामुळे चोरटय़ांची फावले आहे. तीन दिवसांपूर्वी टिळक रस्त्यावरील एका दुकानातून महिलांनी वस्तू चोरून पसार झाल्या होत्या. त्यांना माळीवाडा भागातील काही महिलांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्या महिलांना जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता तेथून त्या पसार झाल्याची बाबदेखील उघड झाली आहे.  कुठल्याच बाबीचे गांभीर्य नसल्याने चोरांचे फावले आहे.यंत्रणा दुबळीगुन्हेगारांवर वचक ठेवणारी, गुन्हे उघडकीस आणणारी आणि नियमित गस्त घालणारी यंत्रणाच शहर पोलिसात केवळ नावालाच असल्याचे चित्र आहे. संबंधित कर्मचारी आपल्या वेगळ्याच कामात मगA राहत असतात. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षकांनीदेखील या बाबीकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचेच चित्र आहे. त्यामुळेच कर्मचा:यांचे फावले आहे. परिणामी शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र आहे.नागरिकांना दिलासा द्यावाघडलेल्या घटनांचा तातडीने तपास करून त्या उघडकीस आणाव्या, पोलिसांचा धाक निर्माण करावा जेणेकरून शहरवासीयांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात        आहे. शहरात चोरीच्या वाढत्या घटनांसह अवैध धंद्यांनीदेखील डोके वर काढले आहे. शहरात भर रस्त्यांवर टप:या टाकून सट्टा व जुगार सुरू आहेत. त्यांमुळे एखाद्या वेळी कायदा व सुव्यस्थादेखील धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे व अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी जनसंपर्कावर भर देऊन त्यांच्यात सामिल होऊन लोकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण करण्याचा प्रय} करीत असतांना दुसरीकडे नंदुरबारसारख्या जिल्हा मुख्यालयाच्या शहरात चो:या आणि अवैध धंद्यामुळे नागरिक बेजार होत असतील तर त्यांच्या प्रय}ांना खिळ घालण्याचेच काम होत असल्याच्या प्रतिक्रियादेखील जनसामान्यांमध्ये व्यक्त होत आहेत.चो:यांना आळा घालण्यासाठी शहर पोलिसांतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी बैठका घेण्यात येत आहे. नागरिकांनीही सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.-मिलिंद वाघमारे, पोलीस निरीक्षक, नंदुरबार शहर ठाणे