शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या प्रारंभीच मिरचीला दरवाढीचा तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवीन वर्षात मिरची उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी सुरु झाली असून ओली लाल मिरची प्रतिक्विंटल चार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवीन वर्षात मिरची उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी सुरु झाली असून ओली लाल मिरची प्रतिक्विंटल चार हजार रुपये दराने खरेदी होत आहे़ परराज्यातून येणारी मिरची आवक बंद झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या मिरचीला दुप्पट भाव मिळू लागल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत़यंदा सुरु झालेल्या हंगामाच्या प्रारंभी व्यापाºयांकडून मिरचीला साधारण तीन हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दर देण्यात येत होते़ अवकाळी पाऊस, खराब हवामान यावर मात करुन संगोपन केलेल्या मिरचीला दिलेले दरही पुरेसे असल्याने शेतकºयांकडून नोव्हेंबरच्या अंतिम आठवड्यात १६ हजार क्विंटल मिरची आवक सुरु झाली होती़ डिसेंबर महिना मिरची हंगामातील सर्वात महत्त्वपूर्ण महिना मानला जातो़ परराज्यातून येणाºया मिरचीमुळे बाजारातील व्यापाºयांची उलाढाल वाढते़ यातून स्थानिक मिरचीची दर पडून मालाही आवकही कमी होते़ परंतू यंदाच्या हंगामात येथील मिरची व्यापाºयांकडे आंध्रप्रदेश व गुजरात राज्यातून येणारी मिरची थांबली आहे़ खासकरुन आंध्रप्रदेशातून येणारी मिरची आलेली नसल्याने व्यापाºयांनी येथील शेतकºयांच्या मिरचीला दुप्पट दर देत खरेदी सुरु ठेवली आहे़ ही स्थिती महिनाभर कायम राहिल्यास मिरची उत्पादकांचे गेल्या दोन वर्षात झालेले नुकसान भरुन येण्यास मदत मिळणार आहे़हंगामात शेतकºयांनी लाली, व्हीनआर या मिरची वाणांना पसंती दिली होती़ यातील लाली आणि व्हीएनआरची सध्या बाजारात चलती आहे़ ओल्या मिरचीला दुप्पट भाव असताना कोरडी मिरचीही चढ्या दरांनी खरेदी होत आहे़ व्यापाºयांकडून सात ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कोरडी मिरची खरेदी होत आहे़बाजारात गेल्या महिन्यात ओली मिरची २ हजार २०० ते २ हजार ८०० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी करण्यात येत होती़ यातून बाजारात आतापर्यंत ३५ हजार क्विंटल मिरची आवक पूर्ण झाली आहे़ डिसेंबर महिन्यात आंध्रप्रदेशातील गुंटूर येथून मिरची नंदुरबारात विक्रीसाठी आणली जाते़ या मिरचीमुळे स्थानिक मिरचीचे दर खाली येऊन खरेदीवरही परिणाम होत होता़ परंतू यंदा गुंटूरची मिरची दाखल झालेली नसल्याने स्थानिक शेतकºयांना त्याचा थेट लाभ झाला आहे़