शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बालकाकडून मजूरी करवून घेणा:या हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 16 वर्षीय बालकाला कामगार म्हणून ठेवत त्याच्याकडून काम करवून घेणा:या शहरातील हॉटेल मालकाविरोधात गुन्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 16 वर्षीय बालकाला कामगार म्हणून ठेवत त्याच्याकडून काम करवून घेणा:या शहरातील हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शहरातील न्यू नवजीवन हॉटेल येथे हा प्रकार उघडकीस आला़ धुळे येथील सुविधाकार दुकाने निरीक्षक रमेश भिमराव शेळके यांना नंदुरबार शहरातील न्यू नवजीवन हॉटेल येथे बालकामगार कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली होती़ त्यानुसार त्यांनी 3 ऑगस्ट रोजी संबधित हॉटेलमध्ये पोलीस पथकासह छापा टाकला होता़ याठिकाणी विजय बापू पाटील रा़ भोईवाडा हा मुलगा दिसून आला होता़ हॉटेलमालक अमृत लक्ष्मण चौधरी याची विचारपूस केल्यावर योग्य ती माहिती मिळाली नव्हती़ दरम्यान दुकाने निरीक्षक यांनी विजय भोई याचे वय हे 16 वर्ष 4 महिने आणि 7 दिवस असल्याचे निदर्शनास आले होत़े हॉटेलमालक चौधरी कामावर ठेवलेला मुलगा विजय भोई याच्याकडून तीन तासांपेक्षा अधिक काळ काम करुन घेत असल्याचेही निर्दशनास आल्यानंतर कारवाई करण्यात आली़ या प्रकाराची 3 जुलैपासून चौकशी सुरु होती़ दरम्यान 29 रोजी चौकशी पूर्ण करत तातडीने शहर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्यात आला़ याबाबत दुकाने निरीक्षक रमेश शेळके यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन हॉटेलमालक अमृत लक्ष्मण चौधरी रा़ जुने कोर्टासमोर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक एम़क़ेक्षीरसागर करत आहेत़ याप्रकरणी अद्याप कोणासही अटक झालेली नाही़ दरम्यान जुलै महिन्यात जिल्ह्यात बाल हक्क संरक्षण आयोगाची सुनावणी झाली होती़ यावेळी जिल्ह्यात एकही बालकामगार नसल्याचा निर्वाळा देण्यात आला होता़ सुनावणीच्या 10 दिवसांनंतर ही कारवाई होऊन तब्बल 20 दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यात बालकामगारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आह़े