शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

मुख्यमंत्री रोजगार योजनेला बँकाकडून खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST

अनेक बेरोजगारांना कोणता न कोणता उद्योग व्यवसाय सुरू करण्याची आवड असते. परंतु नवीन उद्योग सुरू करण्यासाठी लाभार्थ्याला अडचणींचा सामना ...

अनेक बेरोजगारांना कोणता न कोणता उद्योग व्यवसाय सुरू करण्याची आवड असते. परंतु नवीन उद्योग सुरू करण्यासाठी लाभार्थ्याला अडचणींचा सामना करावा लागतो. बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत १८ ते ४५ वयोगटातील लाभार्थी लाभ घेऊ शकतात. यामध्ये इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती, सायकल दुरुस्तीची दुकाने, काटेरी तारांचे उत्पादन, इमिटेशन ज्वेलरी उत्पादन, वर्कशॉप, स्टोरेज बॅटरी उत्पादन आदी व्यवसायांची निर्मिती करू शकतात. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत शहादा तालुक्यातील लाभार्थ्यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून या योजनेंतर्गत प्रस्ताव दाखल केले होते. हे प्रस्ताव मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रशासनाने बँकांकडे सादर केले. विशेष म्हणजे या प्रस्तावांना वेळेत मंजुरी मिळवून बँकांकडून लाभार्थ्यांना तत्काळ कर्जपुरवठा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तालुक्यातील बँकांनी वेगवेगळी कारणे देत प्रस्ताव रद्द केले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने जिल्ह्यातील सुशिक्षित, अर्धशिक्षित युवक व युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला. मात्र बँकांकडून मुख्यमंत्री रोजगार योजनेला शहादा तालुक्यातील बँकाकडून खो दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन राज्य सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार योजनेला बँकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने या योजनेचा आढावा घेऊन प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी बँकांना आदेशित करून उद्योग निर्मितीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

प्रस्ताव रद्द करताना दिली जातात कारणे

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यामध्ये बँकांनी कार्यक्षेत्रात प्रस्ताव बसत नाही, उद्योजकाला, लाभार्थ्याला पुरेसे ज्ञान नाही, लाभार्थ्याने उद्योग निर्मितीसाठी दिलेला पत्ता बरोबर नाही, लाभार्थी प्रकल्प चालविण्यासाठी सक्षम नाही यासह विविध कारणे बँकांकडून दिली जाऊन शहादा तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील विविध बँकांनी प्रस्ताव रद्द केले आहेत.