शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

तापी काठावर साकारतेय ‘चेतक टेन्ट व्हीलेज’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 17:36 IST

सारंगखेडा यात्रा : फेस्टीवलसाठी पर्यटन विभागाने केला 10 वर्षाचा करार

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यात घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेली सारंगखेडा यात्रा आता ‘ग्लोबल फेयर’ रुप धारण करीत असून त्यासाठी पर्यटन विभाग सरसावला आहे. दरम्यान, या यात्रेनिमित्ताने खास ‘चेतक फेस्टीवल’ भरविण्यात येत असून त्यासाठी पर्यटन विभागाने 10 वर्षाचा करार करून निधीची तरतूद केली आहे. या फेस्टीवलनिमित्ताने येणा:या विविध राज्यातील व देशातील पर्यटकांसाठी खास तापी काठावर ‘चेतक टेन्ट व्हीलेज’ साकारत आहे.सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताची यात्रा सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यानिमित्ताने भरणारा घोडेबाजार हा देशातील पाचवा क्रमांकाचा बाजार म्हणून त्याची ओळख होते. या पाचव्या क्रमांकावरून आता पहिल्या क्रमांकावर भरारी घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने पुढाकार घेतला आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावल व स्थानिक प्रसाद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयपाल रावल यांनी त्यासाठी धडपड सुरू केली आहे. गेल्या वर्षापासून चेतक फेस्टीवलला सुरुवात झाली आहे. यंदाही या फेस्टीवलला गेल्यावर्षाच्या तुलनेत व्यापक स्वरुप देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी गेल्या आठवडय़ातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेऊन नियोजन केले आहे. 3 डिसेंबर 2017 ते 2 जानेवारी 2018 असा महिनाभर हा फेस्टीवल सुरू राहणार असून त्यासाठी महिनाभराकरिता वेगवेगळे कार्यक्रम आखण्यात आले आहेत. स्पर्धा, धार्मिक कार्यक्रम, घोडय़ांच्या शर्यती, मनोरंजनाचे कार्यक्रम विविध सेलेब्रिटींच्या उपस्थितीत होणार आहेत.चेतक फेस्टीवलसाठी देशभरातील विविध अश्व शौकीनांना निमंत्रण देण्यात आल्याने अनेक व्हीआयपी येथे येण्याची शक्यता असल्याने त्यासाठी घोडाबाजार पाहण्याकरिता खास व्हीआयपी एसी गॅलरी घोडेबाजारात उभारण्यात येत आहे. शिवाय घोडय़ांबाबत आंतरराष्ट्रीय माहिती मिळावी यासाठी स्वतंत्र फोटो गॅलरी उभारण्यात आली आहे. रशियन महिला फोटोग्राफर कातिया डूझ यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. या यात्रेला पूर्णपणे आंतरराष्ट्रीय लूक देण्यासाठी प्रयत्न होत असून त्यादृष्टीने काम सुरू आहे.विशेष म्हणजे बाहेरून येणा:या व्हीआयपी पर्यटकांना राहण्यासाठी तापी काठावर खास टेन्ट व्हीलेज उभारण्यात येत आहे. जवळपास 70 पेक्षा अधिक व्हीआयपी टेन्ट येथे उभारण्यात येत असून त्यात सर्व अलिशान सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. याशिवाय याच व्हीलेज कॅम्पसमध्ये स्वतंत्र ओपन बार, स्पा सेंटर, डायनिंग हाऊस, रिसेप्शन हाऊस, क्लब यासह अनेक सुविधा राहणार आहेत. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी बोटींग, स्पीडबोट, पॅरासेलींग, पॅराग्लाईडींग, अॅडव्हेंचर स्पोर्टस, हॉर्स राईडींग यासह अनेक सुविधाही राहणार असल्याने यंदाचा फेस्टीवल हा लक्षवेधी ठरणार आहे.