शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
7
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
8
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
9
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
10
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
11
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
12
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
13
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
14
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
15
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
16
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
17
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
19
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
20
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...

चेतक महोत्सवाचे पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सारंगखेडा, ता.शहादा येथील चेतक महोत्सवाला 3 डिसेंबरपासून सुरुवात होत असून त्याचे उद्घाटन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होईल. महिनाभर चालणा:या या महोत्सवात विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक   कार्यक्रम होणार असून दरम्यानच्या काळात जागतिक दर्जाच्या अश्व संग्रहालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सारंगखेडा, ता.शहादा येथील चेतक महोत्सवाला 3 डिसेंबरपासून सुरुवात होत असून त्याचे उद्घाटन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होईल. महिनाभर चालणा:या या महोत्सवात विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक   कार्यक्रम होणार असून दरम्यानच्या काळात जागतिक दर्जाच्या अश्व संग्रहालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती या फेस्टीवल समितीचे अध्यक्ष जयपाल रावल यांनी गुरुवारी दिली.चेतक फेस्टीवल व सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रेसंदर्भात माहिती देण्यासाठी जयपाल रावल यांनी गुरुवारी सारंगखेडा येथे पत्रकार परिषद बोलावली होती. त्यात त्यांनी सांगितले, 3 डिसेंबर ते 2 जानेवारी असा महिनाभर चेतक फेस्टीवल चालणार आहे. त्याचे उद्घाटन 3 डिसेंबरला दुपारी तीन वाजता पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होईल. या वेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व प्रमुख अधिकारी उपस्थित राहतील. दत्त मंदिरावर एकमुखी दत्ताच्या पूजेनंतर चेतक महोत्सवाच्या प्रवेशद्वारावरील फित कापून त्याचे उद्घाटन होईल. चेतक महोत्सवाच्या ठिकाणी फोटो गॅलरी, घोडे पाहण्यासाठी व्हीआयपी          गॅलरी, यात्रेतील सर्वात चांगले असलेले 25 घोडय़ांचे स्वतंत्र प्रदर्शन, हॉर्स रेसींगची व्यवस्था यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या फेस्टीवलच्या पूर्वसंध्येला एकमुखी दत्ताची पालखी गावातून काढण्यात येणार आहे. त्यासाठी विविध गावातील भजनी मंडळ व सांस्कृतिक मंडळ सहभागी होणार आहेत. यावर्षी हा पालखी सोहळा भव्य प्रमाणावर होणार आहे. त्यानंतर 3 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान रोज होणा:या कार्यक्रमांची स्वतंत्र पत्रिका तयार करण्यात आली आहे. त्यात विशेषत: सांस्कृतिक कार्यक्रमासह राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धा, शरीर सौष्ठव प्रतियोगिता, व्हाईस ऑफ सारंगखेडा, प्रसिद्ध पाकतज्ज्ञ विष्णू मनोहर         यांच्या उपस्थितीत कुकींग शो व पाककला स्पर्धा, सारंग नृत्य           स्पर्धा, मीस सारंगी व मिसेस सारंगी सौंदर्य स्पर्धा, सराश्रवण लावणी कार्यक्रम, अश्वदौड प्रतियोगिता तसेच ‘चला हवा येऊ द्या’ हा टीव्हीवरील हास्य कार्यक्रमाची सारंगखेडावारी, अभय दाते यांचा संगीत रजनी कार्यक्रम असे विविध कार्यक्रम होतील. विशेषत: महिलांच्या कार्यक्रमासाठी येथे महिला कट्टा तयार करण्यात आला आहे. रोज सायंकाळी चार ते सहा वाजेदरम्यान घोडय़ांचे विविध लक्षवेधी कार्यक्रम येथे होतील. त्यात टेन्ट पेगींग, हॉर्स जंप शो, हॉर्स डान्स शो, हॉर्स रेस मोटारसायकल असे कार्यक्रम आहेत. रोज एक ते चारदरम्यान महिला कट्टामध्येही महिलांचे कार्यक्रम होतील.