शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे रोखण्यासाठी कृषी विभागाकडून 23 नमुन्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 21:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुष्काळात होरपळलेल्या शेतक:यांची बोगस बियाण्यामुळे फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून विक्री सुरु होण्यापूर्वीच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुष्काळात होरपळलेल्या शेतक:यांची बोगस बियाण्यामुळे फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून विक्री सुरु होण्यापूर्वीच विविध कंपन्यांच्या 23 बियाणे नमुने संकलित करुन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत़ तपासणी अहवाल येत्या 15 दिवसात सादर होणार आह़े जिल्ह्यात यंदा एकूण 2 लाख 18 हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची लागवड होणार आह़े अद्याप पाऊस सुरु झालेला नसल्याने ग्रामीण भागात शुकशुकाट आह़े परंतू विविध बियाणे कंपन्यांच्या नावाने एजंट गावोगावी शेतक:यांच्या भेटी घेत त्यांना बीटीसह धान्य आणि तृणधान्यांच्या वाणाचे बियाणे स्वस्त दरात देण्याचे अमिष दाखवत असल्याने कृषी विभाग सजग झाला आह़े विभागाने नियुक्ती केलेली जिल्हास्तरावरील एक आणि तालुकास्तरावरील सहा पथके ग्रामीण भागात  भेटी देत आहेत़ जिल्ह्यात यंदा बीटी कापूस बियाण्याची 2 लाख 80 हजार पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ 450 बियाणे विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या या पाकिटांची अद्यापही संथगतीने विक्री सुरु असून पावसाच्या हजेरीनंतर वेग वाढण्याची शक्यता आह़े जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ़ बी़एऩपाटील याच्या मार्गदर्शनात नियुक्त केलेल्या पथकांनी वडाळी ता़ शहादा आणि नंदुरबार शहरातून बोगस बियाणे जप्तीची कारवाई केली आह़े सोबतच कापूस बियाण्यांची 23 आणि खताचे 16 नमुने गोळा करुन प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती देण्यात आली आह़े जिल्ह्यात 2017 मध्ये नंबर 9 ज्वारीच्या बोगस वाणामुळे शेतकरी नापिकीला सामोरे गेले होत़े ही स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी कृषी विभागाकडून पेरणीपूर्वी बियाणे आणि खतांचे नमुने घेत आहेत़ त्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येऊन बियाणे बोगस असल्यास कंपनी, ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करुन न्यायालयात खटला चालवला जात आह़े 2017-18 च्या खरीप हंगामात संकलित करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 3 नमुन्यांमध्ये दोष आढळला होता़ यातून संबधित कंपनीसह विक्रेत्यांविरोधात सध्या न्यायालयात खटला सुरु आह़े