शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

जि.प.कर्मचारी बदली प्रक्रिया ऐनवेळी झाली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद बदल्यांचे सत्र गुरुवारपासून सुरू करण्यात आले. परंतु दुपारनंतर शिक्षक मतदारसंघासाठीची आचारसंहिता सुरू लागू झाल्याने ऐनवेळी ही प्रक्रिया थांबविण्यात आली. आता शासनाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामुळे बदलीपात्र कर्मचा:यांनी तात्पुरत्या स्वरूपात सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. जिल्हा परिषदेच्या विविध दहा ते बारा विभागांच्या बदल्यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद बदल्यांचे सत्र गुरुवारपासून सुरू करण्यात आले. परंतु दुपारनंतर शिक्षक मतदारसंघासाठीची आचारसंहिता सुरू लागू झाल्याने ऐनवेळी ही प्रक्रिया थांबविण्यात आली. आता शासनाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामुळे बदलीपात्र कर्मचा:यांनी तात्पुरत्या स्वरूपात सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. जिल्हा परिषदेच्या विविध दहा ते बारा विभागांच्या बदल्यांची प्रक्रिया गेल्या महिनाभरापासून सुरू होती. गुरुवारी समुपदेशन शिबिरांतर्गत कर्मचा:यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सकाळपासून समुपदेशन शिबिर घेण्यात आले. दुपार्पयत चार विभागांची प्रक्रिया पार पडल्यानंतर आचारसंहितेच्या कारणामुळे ऐनवेळी ही प्रक्रिया थांबविण्यात आली.समुपदेशन शिबिरजिल्हा परिषद सभागृहात गुरुवार, 24 रोजी सकाळपासून समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी अर्थ विभाग, बांधकाम विभाग, लघुसिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा व आरोग्य विभागाच्या बदल्यांचा समावेश होता. त्यानुसार प्रत्येक विभागनिहाय बदलीपात्र कर्मचा:यांना पाचारण करण्यात येत होते.याआधीच सेवाज्येष्ठतेनुसार व बदलीपात्र कर्मचा:यांच्या याद्या जिल्हा परिषदेने पंचायत समिती स्तरावरून व त्या त्या विभागाकडून मागविल्या होत्या. त्यानुसार बदलीच्या सॉफ्टवेअरमध्ये ते फिड करण्यात आले होते. बदलीपात्र कर्मचा:यांना समुपदेशन शिबिरात बोलावून त्यांना सभागृहातील स्क्रीनवर रिक्त होणा:या एक ते पाच जागा दाखविल्या जात होत्या. कर्मचा:याने पसंतीक्रमानुसार जागा निवडल्यावर जागा रिक्त असल्यास लागलीच संबंधिताला त्या जागेवर बदली मिळत होती. यामुळे बदल्यांमध्ये कुठेही कुणा पदाधिकारी, अधिकारी किंवा इतर मध्यस्थाचा हस्तक्षेप राहत नव्हता. त्यामुळे कर्मचा:यांमध्येदेखील समाधान व्यक्त करण्यात आले. कर्मचा:यांना बदली ऑर्डर मिळाल्यानंतर 31 मेच्या आत लागलीच रुजू होण्याचे आदेश देण्यात येणार होते. त्यामुळे संबंधित ठिकाणाचे काम रखडणार नाही याची दक्षता घेण्याचा उद्देश त्यामागे होता.व्हिडिओ चित्रीकरण : संपूर्ण बदली प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणदेखील करण्यात येत होते. जेणेकरून या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी हा त्यामागचा उद्देश आहे.  दरम्यान, शुक्रवारी आरोग्य विभागाच्या राहिलेल्या बदल्या आणि सामान्य प्रशासन, कृषी, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण, समाज कल्याण, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागासह इतर विभागांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते. शिक्षक बदल्यांचे काय? शिक्षक बदल्याही आचारसंहितेत अडकतात किंवा कसे याकडेही लक्ष लागून आहे. कारण या बदल्या राज्यस्तरावरून ऑनलाईन करण्यात येत आहेत. काही जिल्ह्यात आदेशही प्राप्त झाले आहेत. याकडेही लक्ष लागून आहे.अधिकारी, पदाधिकारी उपस्थित : बदल्यांच्या समुपदेशन शिबिरात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींना बसता येते. त्यांच्या निगराणीखाली प्रक्रिया राबविता येते. याशिवाय संबंधित विभागाचे विभागप्रमुखही उपस्थित राहतात. शिबिराच्या सकाळच्या सत्रात उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीष सांगळे यांच्यासह संबंधित विभागाचे विभागप्रमुख व बदलीपात्र कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही सभागृहात बसण्याची परवानगी देण्यात आली नाही.नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता गुरुवारी दुपारनंतर लागू करण्यात आली. ही माहिती जिल्हा परिषदेर्पयत पोहचण्यात सायंकाळ झाली. तोर्पयत बदली प्रक्रिया कायम होती. आचारसंहिता लागू झाल्याचे समजताच प्रक्रिया थांबविण्यात आली. यासंदर्भात जिल्हा परिषदेने तातडीने आयुक्तालय व मंत्रालयात याबाबत मार्गदर्शन घेतले. त्यांनी बदली प्रक्रिया थांबविणे किंवा रद्द करण्याचे सूचित केल्यानंतर लागलीच सकाळपासून सुरू असलेली बदल्यांची प्रक्रिया बंद करून अधिकारी, कर्मचारी आपल्या कामाला लागले.