लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील स्वच्छतेच्या कामांसाठी नेमण्यात आलेला ठेकेदार हा मनमानी कारभार करीत आहे. त्यामुळे शहरात नेहमीच स्वच्छतेचा प्रश्न निमाण होत आहे. परिणामी डासांचे प्रमाणही वाढले असून त्याला शहरातील नागरिक बळी पडत आहे. या ठेकेदाराच्या कारभाराला कंटाळून सभापती पदाचा राजीनामा देणार असल्याचा इशारा आरोग्य सभापती मंगला सैन यांनी दिला आहे. शहरातील विविध भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फवारण्यात येणा:या मिश्रणात औषध कमी आणि रॉकेलच अधिक आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील साईनगरातील नागरिकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांना निवेदन दिले. नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.याविषयी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरातील साईनगरी डेंग्यूसदृश आजाराचे सात रुग्ण आढळले आहे. अन्य भागातही डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. शहरातील अनेक नागरिक रोज सकाळी व सायंकाळी बसस्थानक परिसर ते कॉलेज रोड, साईमंदिर आदी भागात फिरायला जातात. या भागात डासांमुळे नागरिकानां फिरणेही मुश्किल झाले आहे. शहरातील प्रत्येक परिसरात हिच परिस्थिती आहे. औषधाऐवजी केवळ रॉकेलची फवारणी केली जात आहे. स्वच्छतेच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदारावर नगरपालिका प्रशासनाचा वचक नाही. त्यामुळे स्वच्छतेचे बारा वाजले आहेत. स्वच्छता राखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर डॉ. अमित मावची, महेंद्र वळवी, राजेंद्र नेरकर, महेश पुरकर, एन. एन. महाजन, सी. एम. फराटे, उल्हास पाथरकर यांच्या सह्या आहेत. दरम्यान, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेक भागात औषध फवारणी वेळेवर केली जात नाही. स्वच्छतेच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदाराच्या कारभाराला वैतागून आरोग्य सभापती मंगला सैन यांनी सभापतीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.
शहरात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरातील साईनगरी डेंग्यूसदृश आजाराचे सात रुग्ण आढळले आहे. अन्य भागातही डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. याला सर्वस्वी शहरातील अस्वच्छता कारणीभूत असल्याची तक्रार करण्यात आली.