लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅफलाइन जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यासाठी प्रशासनाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांची जिल्ह्यातील शिक्षक संघटनांना माहिती व्हावी, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी आॅनलाईन बैठक घेण्यात येणार आहे.४ आॅगस्ट रोजी होणाºया चर्चेत संघटनेच्या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांना पंचायत समिती येथे उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे. याबाबत जिल्ह्यातील शिक्षक संघटनांच्या अध्यक्षांना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षकांच्या १५% जिल्हांतर्गत बदल्या आॅफलाईन पद्धतीने करण्याबाबत शासनाकडून कळविण्यात आलेले आहे.या बदल्यांबाबत संघटनेशी चर्चा करण्याकरीता नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली ४ रोजी सकाळी १२ आॅनलाईन बैठक होईल. यासाठी संघटनेचे एक प्रतिनिधी यांनी आपल्या तालुक्यातील गशिक्षणाधिकारी यांच्यासह पंचायत समिती कार्यालय येथे उपस्थित रहावे. ही व्हीडीओ कॉन्फरन्स केवळ सन २०२०-२१ या वषार्तील जिल्हांतर्गत बदलीबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कोवीड १९ प्रादुर्भाव संदर्भातील मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षक बदल्यांसदर्भात शिक्षक संघटनांशी सीईओ करणार चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 12:52 IST