शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आकडेमुक्त गाव संकल्पना अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 11:20 IST

तळोद्यात जनता दरबार : वीज वितरण कंपनीने गावागावात शिबिरे घेण्याची अपेक्षा

ठळक मुद्देऊस जळाल्याच्या घटनेनंतरही तारा अजून ‘जैसे थे’च लोंबकळणा:या तारांमुळे गेल्यावर्षी ऊस जळण्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्यानंतरही लोंबकळणा:या तारांबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांनी कार्यवाही केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. तळोदा शिवारातील रोहीत वसोमावल येथील ग्राहकांना हजारोंची वीज बिले तालुक्यातील सोमावल येथील ग्राहकांना मीटर रिडींगचा फटका बसला असल्याची तक्रार वीरसिंग पाडवी यांनी केली होती. जवळपास 30 ते 35 हजार रुपयांची बिले येथील ग्राहकांना आकारण्यात आलेली आहेत. तसे बिलेदेखील अधिका:यांना दाखवि

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वीज वितरण कार्यालयाकडे वीज कनेक्शनसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून अर्ज दाखल करूनही अजूनपावेतो कार्यवाही केली नसल्याची तक्रार तालुक्यातील अनेक गावांमधील नागरिकांनी प्रत्यक्ष जनता दरबारात केली. त्यामुळे आकडेमुक्त गाव संकल्पना तालुक्यात तरी अपयशी ठरल्याचे चित्र आहे. वीज जोडण्यांसाठी अधिका:यांनी गावागावात कॅम्प आयोजित करण्याची मागणीही या वेळी ग्राहकांनी केली आहे. येथील संत सावता माळी भवनात तालुक्यातील वीज समस्यांबाबत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आमदार उदेसिंग पाडवी  होते. याप्रसंगी वीज समस्यांबाबत नागरिकांनी पाढा वाचला. पिंपरपाडा, रतनपाडा, सोरापाडा, रोझवा पुनर्वसन, कालीबेल यासह अनेक गावांमधील ग्राहकांनी वीज कनेक्शनसाठी वीज वितरण कार्यालयाकडे गेल्या अनेक महिन्यांपासून अर्ज केलेला आहे. तथापि, त्यावर अजूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. याबाबत कार्यालयातदेखील पाठपुरावा केला आहे. तरीही कुणी लक्ष द्यायला तयार नाही, असा आरोपदेखील कुरेसिंग वळवी, लालसिंग वळवी, केलसिंग पावरा यांनी केला. नवीन कनेक्शन देण्यासाठी गावागावात अधिका:यांनी कॅम्प आयोजित करावे, अशी मागणीही या रहिवाशांनी केली. तातडीने कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना शहादा विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय भामरे यांनी दिल्या. याशिवाय अनेक ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर, गंजलेल्या वीजतारा, खांब, नवीन खांब टाकण्याची मागणी या वेळी नागरिकांनी केली. तेव्हा उपअभियंता सचिन काळे यांनी निधी नसल्यामुळे ही कामे रखडली असून, यासाठी निधीची मागणी डीपीडीसीकडे केल्याचे सांगितले. तसेच काही ठिकाणी कर्मचा:यांअभावी गावक:यांना  तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे कर्मचारी देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय चुकीच्या रिडींगमुळे अव्वाच्या सव्वा वीज बिले येत असल्याचा तक्रारी ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणावर केल्याबाबत संबंधित अधिका:यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. या वेळी भामरे           यांनी तातडीने रिडींगबाबत           दुरूस्ती करून सुधारित बिले अदा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आमदार पाडवी यांनी वीज कनेक्शनसाठी तातडीने गावागावात मोहीम हाती घेवून ग्राहकांना मीटर उपलब्ध करून द्यावे. शिवाय नवीन ट्रान्सफार्मर, गंजलेले खांब, लोंबकळणा:या तारा व तांत्रिक बिघाडाबाबत ठोस कार्यवाही करण्याची सूचना दिली.सूत्रसंचालन कौशल पाटील यांनी तर आभार मधुकर मराठे यांनी मानले. या जनता दरबारास शहादा विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय भामरे, उपअभियंता सचिन काळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र   राजपूत, नगरसेवक अजय परदेशी, विश्वनाथ कलाल, वीरसिंग पाडवी, भास्कर मराठे, संजय कलाल, दाज्या पावरा, अभियंता नीरजकुमार,  अन्सारी, डॉ.स्वप्नील बैसाणे आदींसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लाईनमन व नागरिक उपस्थित होते.