शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

सीसीआयने नंदुरबार जिल्ह्यातील कापूस खरेदी थांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 12:32 IST

नंदुरबार : कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडियाकडून चालवण्यात येणारे कापूस खरेदी केंद्र सोमवारपासून बंद होणार आहे़ तब्बल ६४ केंद्रांमध्ये ही ...

नंदुरबार : कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडियाकडून चालवण्यात येणारे कापूस खरेदी केंद्र सोमवारपासून बंद होणार आहे़ तब्बल ६४ केंद्रांमध्ये ही खरेदी बंद होणार असून जिल्ह्यातील शहादा आणि नंदुरबार येथेही खरेदी थांबवण्यात आली आहे़नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र आणि शहादा येथील विविध पाच सूतगिरण्यांमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदी करण्यात येतो़ यंदा हंगाम सुरु झाल्यानंतर ५ हजार ४५० रुपये हमीभाव जाहिर करणाऱ्या सिसीआयकडून कापूस खरेदी सुरु झाली होती़ प्रारंभी खाजगी व्यापाऱ्यांनी कापूस दर वाढवल्याने सीसीआयने कापूस खरेदी बंद केली होती़ परंतू डिसेंबरपासून सीसीआयने कापूस खरेदीला वेग दिला होता़ हमीभावापेक्षा २०० रुपये कमी दरात कापूस खरेदी करण्याचा सपाटा सीसीआयने लावला होता़ बँक खात्यात रक्कम मिळणार असल्याने शेतकऱ्यांनीही कमी भावात का, असेना विश्वसनीय म्हणून कापूस विक्री केली होती़ यातून नंदुरबार केंद्रावर १३ हजार ३५० तर शहादा येथील केंद्रावर २६ हजार क्विंटल कापूस सीसीआयकडून खरेदी करण्यात आला आहे़ ४ मार्च रोजी बाजार बंद झाल्यानंतर मंगळवारी सीसीआयकडून खरेदी होईल अशी अपेक्षा असताना केंंद्र बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती़ यानंतर संपूर्ण आठवडाभर हे दोन्ही ठिकाणचे केंद्र बंद होते़ अखेरीस सीसीआयने खरेदी बंद केल्याची माहिती देण्यात आली आहे़नंदुरबार आणि शहादा सह सीसीआयची राज्यात ६२ खरेदी केंद्र आहे़ ही केंद्रेही सोमवारपासून बंद होणार असल्याची माहिती आहे़ सीसीआयकडून हंगाम सुरु होण्यापूर्वी कापूस खरेदी करण्यासाठी गुणवत्तेनुसार हमीभाव ठरवला होता़ केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित काम करणाºया सीसीआयने मेडियम लाँग स्टेपल अर्थात मध्यम आकाराचा धागा निर्माण करणारा कापूस म्हणून महाराष्ट्रातील कापसाची निवड केली होती़ यासाठी ५ हजार १५० ते ५ हजार ३५० प्रतिक्विंटल दर ठरवले होते़ हे दर हमीभावापेक्षा कमीच होते़ प्रामुख्याने राज्यातील शेतकºयांनी यंदा ‘एके वाय १’ या वाणाच्या कापसाची लागवड केली होती़ या कापसातून निघणारा धागा हा साधारणपणे २६़५ ते २७ मिलीमीटरपर्यंतच निघत असल्याने कापूस खरेदी करणाºया खाजगी वस्त्रोद्योगांनी या कापसाच्या खरेदीला नकार दिला होता़ परिणामी हंगामाची पूर्णपणे सांगता न करताच सीसीआयने कापूस खरेदी बंद करत गेल्या सोमवारपासून व्यवहार पूर्णपणे थांबवले होते़ सीसीआयच्या निर्णयामुळे खेडा पद्धतीसह कापूस खरेदी करणारे आणि विविध भागात जिनिंग मिलमधील खाजगी व्यापाºयांना याचा लाभ होऊन त्यांच्याकडून कापसाचे प्रतिक्विंटल दर पाडले जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे़