शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
2
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
3
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
5
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
6
बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार!
7
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
8
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
9
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
10
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
11
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
12
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
13
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
14
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
15
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
16
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
17
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
18
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
19
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
20
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप

चेतक फेस्टीवलमध्ये सिने अभिनेत्यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 17:33 IST

सारंगखेडा यात्रा : महिलांसाठी विविध स्पर्धा, घोडेबाजारात विक्रमी उलाढाल होणार

सारंगखेडा : येथील चेतक फेस्टीवलला शुक्रवारी हिंदी चित्रपट सृष्टीतील कलावंतांनी भेट दिली. त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, शुक्रवारी चेतक फेस्टीवलमध्ये टेंट पेगिंग स्पर्धा व महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी घोडेबाजारात 30 घोडय़ांची विक्री झाली असून यंदा या बाजारात विक्रमी उलाढाल होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.सारंगखेडा येथे चेतक फेस्टीवलमध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार शेखर सुमन, अर्चना पुरणसिंग, परमीत सेठी व अली फजल यांचे आगमन झाले. या अभिनेत्यांनी मंदिरावर जाऊन दत्तप्रभूंचे दर्शन घेतले. मंदिरापासून त्यांचे वाजत-गाजत चेतक फेस्टीवलमध्ये आगमन झाले. ते प्रेक्षक गॅलरीत बसून या अभिनेत्यांनी टेंट पेगिंग स्पर्धेतील चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहिली. हे प्रात्यक्षिके त्यांनी आपल्या मोबाईलमध्येही कैद केले. तसेच अश्वचित्र प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली. चारही कलाकारांच्या हस्ते टेंट पेगिंग स्पर्धेतील विजेत्या बीएसएफ टीमचा सन्मान करण्यात आला. या कलाकारांचे जयकुमार रावल व जयपालसिंह रावल यांच्या हस्ते अश्व कलाकृती भेट देऊन गौरव केला. कन्या वनसमृद्धी योजनेंतर्गत शेतकरी, शेतमजुरी करणा:या कुटुंबातील व दोन मुलींवर कुटुंब नियोजन करणा:या मातांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अभिनेत्री  अर्चना पुरणसिंग म्हणाल्या की, चेतक फेस्टीवलमध्ये होणा:या सन्मानामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढणार आहे. लेक वाचली तरच सृष्टी वाचेल त्यामुळे प्रत्येकाने महिलांचा सन्मान केला पाहिजे, असे सांगितले. या वेळी कन्या वनसमृद्धी योजनेंतर्गत वनविभागाच्या वतीने दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणा:या भूषण गिरासे व चंदू साठे यांचा सप}ीक सत्कार केला. अभिनेता शेखर सुमन म्हणाले की, पर्यटनमंत्री जयकुमार रावल व जयपालसिंह रावल यांनी सारंगखेडय़ासारख्या छोटय़ाशा गावात आंतरराष्ट्रीय स्तरावरील चेतक फेस्टीवलचे आयोजन करून या गावाचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचवले आहे. बीएसफच्या जवावांनी दाखविलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून आपण थक्क झाले असून त्यांना सलाम करीत असल्याचे ते म्हणाले. पर्यटनमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, पर्यटन विभागाकडून सारंगखेडा व राज्याच्या विकासासाठी प्रय} सुरू असून चेतक फेस्टीवलमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना आणण्यासाठी प्रय} असल्याचे सांगितले.महिलांसाठी स्पर्धाया वेळी महिला मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी उखाणे व इतर स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच उत्कृष्ट बचट गट चालविणा:या महिला, अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला.  या वेळी जि.प. अध्यक्षा रजनी नाईक म्हणाल्या की, बचत गटाच्या माध्यमातून महिला आता स्वयंभू होऊन कुटुंबाला पुरुषांबरोबर समान हातभार लावून प्रगती साधत असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पर्यटन विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापकीय संचालक नितीन मुंडावरे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, विक्रांत रावल, जि.प. सदस्या ऐश्वर्या रावल, दोंडाईचाच्या नगराध्यक्षा नयनुकंवर रावल, जि.प. सदस्या पूनम भामरे, महिला बालकल्याण विभागाचे रणजित कु:हे, सीमरनजितसिंग नागरा, प्रणवराज रावल, रणवीर रावल, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार, डीएफओ एस.बी. केवटे, एस.आर. चौधरी, ए.जे. पवार, व्ही.टी. पदमोर, युवराज नायक, पी.आर. वाहा, सहायक गटविकास अधिकारी सी.टी. गोस्वामी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जयपालसिंह रावल यांनी केले. सूत्रसंचालन दिनेश कोयंडे यांनी तर आभार प्रणवराज रावल यांनी मानले. कार्यक्रमासाठी चेतक फेस्टीवल समितीच्या महिला व पुरुष पदाधिका:यांनी परिश्रम घेतले.शुक्रवारी 30 घोडय़ांची विक्रीसारंगखेडा यात्रेत भरलेल्या घोडेबाजारात शुक्रवारी 30 घोडय़ांची विक्री होऊन नऊ लाख 81 हजार         500 रुपयांची उलाढाल झाली. यात्रेत विक्रीसाठी आलेल्या  अडीच हजार घोडय़ांपैकी आजअखेर एक हजार 10 घोडय़ांची विक्री झाली असून त्यातून तीन कोटी 40 लाख 38 हजार 900 रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. यंदा घोडेबाजारात विक्री उलाढाल होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.