शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विखरण येथील युवकाच्या खून प्रकरणी एकास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 11:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील विखरण येथे मजूरीच्या वाटपातून झालेल्या वादातून युवकाचा खून झाला होता़ या प्रकरणी नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने एकास दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आह़े विखरण येथील संतोष दामू भिल याचा गावातीलच संतोष सदू भिल याच्यासोबत मजूरीच्या पैशांवरून वाद झाला होता़ वादानंतर 29 जुलै 2015 रोजी विखरण गावात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील विखरण येथे मजूरीच्या वाटपातून झालेल्या वादातून युवकाचा खून झाला होता़ या प्रकरणी नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने एकास दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आह़े विखरण येथील संतोष दामू भिल याचा गावातीलच संतोष सदू भिल याच्यासोबत मजूरीच्या पैशांवरून वाद झाला होता़ वादानंतर 29 जुलै 2015 रोजी विखरण गावात जुन मोहिदे रस्त्यावर मित्रांसोबत गप्पा मारणा:या संतोष दामू भिल याच्यावर संतोष सदू भिल याने कोंबडी कापण्याच्या सु:याने वार करून जखमी केले होत़े यात त्याचा मृत्यू झाला होता़ आरोपी संतोष सदू भिल याच्याविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात सुकमाबाई भिल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दोषारोपपत्र पोलीस उपनिरीक्षक डी़एस़ महिरे यांनी न्यायालयात दाखल केले होत़े सरकार पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले होत़े यात दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली व इतर साक्षीदारांनी गुन्ह्यासंदर्भात महत्त्वपूर्ण साक्ष दिल्याने अभियोग पक्षाचा पुरावा मान्य करून जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी आरोपी संतोष सदू भिल यास कलम 302 अन्वये जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला आह़े दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा त्यास देण्यात आली आह़े सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील यशवंतराव मोरे यांनी काम पाहिल़े