शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या अनास्थेमुळे पाणी गेले वाहून : रोझवा लघुसिंचन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 12:43 IST

सांडव्याच्या भिंतीला पडले खड्डे

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 11 : तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील लघु प्रकल्प शासकीय अनास्थेचा बळी ठरला आह़े दुरूस्तीची गरज असतानाही भिंत दुरूस्त न झाल्याने दोन महिन्यांपूर्वी तुडूंब भरलेला प्रकल्प तळाला गेला आह़े सातपुडय़ाच्या पायथ्याशी तळोदा-धडगाव रस्त्यालगत रोझवा लघुसिंचन प्रकल्प आह़े जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे यंदा प्रकल्प तुडूंब भरला होता़ ऑक्टोबरअखेरीर्पयत प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत होत़े मात्र त्यानंतर सातत्याने प्रकल्पातील भिंतीतून पाणी ङिारपत असल्याने जलसाठा कमी झाला आह़े नंदुरबार मध्यम प्रकल्पाच्या अखत्यारितील या प्रकल्पाची डागुडूजी करण्याची तसदीही संबधित विभागाने घेतलेली नसल्याने आदिवासी शेतक:यांच्या हक्काचे पाणी वाहून गेले आह़े हा प्रकार कधी थांबेल, याकडे आता शेतक:यांचे लक्ष लागले आह़े 1़63 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असलेल्या रोजवा प्रकल्प पावसाळ्याच्या दोन महिन्यातच ओव्हरफ्लो झाला होता़ प्रामुख्याने रोझवा, रांझणीसह लगतच्या 20 गावांची भूजल पातळी वाढवण्यास हा प्रकल्प सहाय्यकारी ठरतो़ गेल्या तीन वर्षापासून या प्रकल्पात निरनिराळ्या दुरूस्त्यांची कामे निघत असल्याने जलसाठय़ावर परिणाम होतो आह़े गेल्या दोन महिन्यांपासून सांडव्याच्या मुख्य भिंतीला मोठमोठी छिद्रे पडली असल्याचे दिसून आले होत़े कालांतराने या छिद्रांमधूून पाणी वाहणे सुरूच राहिल्याने पाणी वाहून गेले आह़े पाणी वाहणे अविरतपणे सुरूच राहिल्याने सांडव्याच्या खालच्याभागात दलदलीसारखा परिसर निर्माण झाल्याचे अनेकांचे म्हणणे आह़े गेल्या दोन वर्षात गेट आणि पाटचारीची दुरूस्ती वेळेवर न होऊ शकल्याने प्रकल्पातून पाणी वाहून गेले होत़े तर यावर्षी दगडी भिंतच खड्डेमय झाल्याने समस्या अधिक वाढली आह़े येथील शेतकरी आणि ग्रामस्थ हे वारंवार याबाबत नंदुरबार मध्यम प्रकल्प कार्यालयाकडे संपर्क साधून दुरूस्तीबाबत कळवत आहेत़ ब:याचवेळा यातील अनेकांना संबधित प्रकल्प प्रकाशा बॅरेजचच्या अधिका:यांच्या देखरेखीखाली असल्याचे सांगून टाळले जात असल्याचेही सांगण्यात आले आह़े