शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रोझवा लघुप्रकल्पातून पाणी जातय वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा लघुप्रकल्पाला लागलेल्या गळतीने यंदाचाही रब्बी हंगाम संकटात सापडला असल्याची माहिती आह़े हजारो लीटर पाणी सांडव्याच्या भिंतींवरुन वाहून जात असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े तरी संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आह़ेतळोदा तालुक्यातील रोझवा लघुप्रकल्पाला लागलेली गळती शेतक:यांसाठी चांगलीच डोकेदुखी ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा लघुप्रकल्पाला लागलेल्या गळतीने यंदाचाही रब्बी हंगाम संकटात सापडला असल्याची माहिती आह़े हजारो लीटर पाणी सांडव्याच्या भिंतींवरुन वाहून जात असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े तरी संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आह़ेतळोदा तालुक्यातील रोझवा लघुप्रकल्पाला लागलेली गळती शेतक:यांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आह़े ‘लोकमत’तर्फे वेळोवेळी याबाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले आह़े याचाच परिणाम म्हणून संबंधित विभागाने पाटचारी, चॅनल गेटची दुरुस्ती केली होती़ परंतु सांडव्याची दुरुस्ती न झाल्याने पाण्याची गळती सुरुच आह़े सांडव्याची दुरुस्ती झाली नसल्याने परिणामी ‘ऑव्हरफ्लो’ झालेल्या लघुप्रकल्पांमधील पाणी सांडव्याच्या भिंतींमधून वाहून जात आह़े दररोज हजारो लीटर पाणी वाहत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आह़े रोज हजारो लीटर पाणी वाहुन जात असल्याने लघुप्रकल्पामध्ये सध्या निम्मेच पाणीसाठा शिल्लक आह़े त्यामुळे रब्बी हंगाम व उन्हाळी पिकांचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आह़े दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शेतक:यांना रब्बी हंगाम गमवावा लागतो की काय? अशी भिती शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, परिसरातील शेतक:यांनी लघुप्रकल्पातील पाणीसाठय़ाचा अंदाज घेऊन गहू, मका सारखे जास्त पाणी लागणारे रब्बी पिक न घेता हरभरा पेरणीला प्राधान्य दिले आह़े जेणेकरुन लघुप्रकल्पातील जलसाठा झपाटय़ाने कमी झाला तरी हरभरा पिकाच्या उत्पन्नावर याचा काही परिणाम होणार नाही असा शेतक:याचा विश्वास आह़े लघुप्रकल्पांमधील पाणी गळतीमुळे शेतक:यांना रब्बी हंगामातील पिक घेतांना व्दिधा मनस्थिती झाली असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आह़े काही शेतकरी रब्बी पिकही न घेता शेतं गुरांना वैरण म्हणून मका पिक पेरत असल्याचेही चित्र परिसरात दिसून येत आह़े पाणीपातळी पुन्हा खोलावणाररोझवा लघुप्रकल्पाचा जलसाठा कमी होत असल्याने जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ार्पयत उरलासुरला जलसाठा खूपच कमी झाला तर परिसरातील विहिरी, कुपनलिका यांचीही पाणीपातळी लगोलग खालावते असे जाणकार शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे निदान या वर्षी तरी संबंधित विभागाने सांडव्याच्या भिंतींची दुरुस्ती करुन ही गळती कायमची बंद करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े