लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बसस्थानकात बस थांबवून लाँग शिट भरण्यासाठी जातो असे सांगून गेलेला कंडक्टर तिकिट वाटप मशिन आणि प्रवाशांचे पैसे यासह बेपत्ता झाल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी 11 वाजता घडला़ याप्रकरणी वाहकाच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल झाला असून सततच्या डय़ूटीमुळे कंटाळत वाहकाने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आह़े मंगळवारी सकाळी 11 वाजता एमएच 40 एन 1335 या क्रमाकांची अक्कलकुवा ते नाशिक बस घेऊन चालक भटू निळकंठ पाटील व वाहक दिपक भरत पाटील हे दोघेही नंदुरबार बसस्थानकात आले होत़े यावेळी चालक दिपक भरत पाटील हे लाँग शिटची एंट्री करुन येतो असे सांगून कंट्रोल केबीनकडे चालते झाले होत़े बराच वेळ होऊनही ते न आल्याने चालक भटू पाटील यांनी तपास सुरु केला़ परंतू वाहक दिपक पाटील हे मिळून आले नाहीत़ ही माहिती त्यांनी नंदुरबार आणि अक्कलकुवा आगारात दिल्यानंतर एकच खळबळ उडाली होती़ वाहक दिपक पाटील यांच्याकडे तिकिट वाटपाचे मशिन आणि प्रवाशांचे 280 रुपये असल्याची माहिती देण्यात आली होती़ यातील तिकिट मशिन सापडल्याचे सांगण्यात आले असून 280 रुपये आणि वाहक पाटील दोघेही बेपत्ता आहेत़ याबाबत चालक भटू पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वाहक दिपक पाटील रा़ नवापुर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे करत आहेत़ वाहक पाटील हे मंगळवारी पहाटे बाहेरगावाहून डय़ूटी करुन परतले होत़े त्यानंतर त्यांना पुन्हा सकाळी नाशिक बसवर पाठवण्यात आल़े यातून काहीशी मनस्थिती बिघडून ते बस सोडून निघून गेले असावेत असा अंदाज व्यक्त होत आह़े घटनेला 24 तास उलटूनही बेपत्ता वाहक पाटील हे मिळून आलेले नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आह़े
सलग डय़ूटीमुळे कंटाळलेला वाहक एसटी सोडून झाला ‘बेपत्ता’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:31 IST