शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

परवाना विना हातगाडीधारक वा:यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील किरकोळ व्यवसाय करणा:या हातगाडय़ा व लॉरीधारकांना पालिकेकडून अधिकृत परवाना देण्यात यावा,  अशी मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील किरकोळ व्यवसाय करणा:या हातगाडय़ा व लॉरीधारकांना पालिकेकडून अधिकृत परवाना देण्यात यावा,  अशी मागणी नगरसेविकांनी केली आहे. त्यामुळे त्यांना निदान  विविध बँकांकडून कर्ज घेता येईल, असे शंभरावर व्यावसायिक आहेत.याबाबत पालिकेच्या मुख्याधिका:यांना निवेदन देण्यात आले असून, त्यात म्हटले आहे की, तळोदा शहरातील बहुसंख्य व्यवसायिक लोटगाडी, टपरी व           खाली बसून भाजीपाला, फळे, चणे-फुटाणे, चहा-नास्ता, खाद्यपदार्थ  असा छोटासा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. परंतु आजच्या या आधुनिक काळात त्यांना हा व्यावसाय करताना कुठलाही आधार नाही, संरक्षण  नाही, उत्पन्नाचे साधन असल्याचा दाखलाही त्यांच्याकडे नाही. सावकाराकडून घेतलेल्या पैशातूनच ते आपला व्यवसाय करीत  आहेत. या व्यावसायिकांकडे अधिकृत परवाना नसल्यामुळे त्यांना विविध सरकारी अथवा सहकारी बँकांकडून कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. ते बँकांकडे कर्ज काढण्यासाठी  जातात. तेव्हा त्यांना पालिकेच्या अधिकृत व्यवसायाचा परवानाच विचारला जात असतो. मात्र त्यांच्याकडे परवाण्याचा दाखला नसल्यामुळे ते देऊ शकत नाही. परिणामी त्यांना स्वस्त कर्जापासूनदेखील   वंचित राहावे लागत आहे. छोटाशा व्यवसायामुळे आपल्या मुला-मुलींच्या उच्च शिक्षणाचा आर्थिक प्रश्न निर्माण होत असतो.वास्तविक नगरपालिकेकडून  सदर व्यावसायिकांकडून दैनंदिन भाडे आकारून वसुली केली जात असते. त्यासाठी पालिकेने स्वतंत्र ठेकादेखील दिलेला आहे. तथापि आर्थिक  सहाय करणा:या संस्थांकडून परवाना अभावी आर्थिक सहाय केले जात नसल्याने पालिकेने या व्यावसायिकांना तात्काळ अधिकृत परवाना उलब्ध करुन द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रतोद संजय  माळी, माजी उपनगराध्यक्ष गौरव वाणी, नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, सुभाष चौधरी, हितेंद्र क्षत्रिय,  कल्पना पाडवी, अनिता परदेशी, संदीप परदेशी, योगेश मराठे आदींनी केली आहे.