शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

संक्रांतीनिमित्त नंदुरबारात चढला पतंगज्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात पतंगज्वर चांगला चढला पतंगच्या बाजारात मोठय़ा प्रमाणावर उलाढाल झाली. मांजा तयार करण्यासाठी कारागिरांकडे रांगा लागल्या होत्या. दरम्यान, नायलॉन मांजाची विक्री शनिवारी देखील सर्रास सुरूच होती.मकरसंक्रांतीनिमित्त नंदुरबारात पतंगोत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी गेल्या महिनाभरापासून तयारी सुरू करण्यात आली होती. सुटीच्या दिवशी सकाळी व सायंकाळी मोठय़ा प्रमाणावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात पतंगज्वर चांगला चढला पतंगच्या बाजारात मोठय़ा प्रमाणावर उलाढाल झाली. मांजा तयार करण्यासाठी कारागिरांकडे रांगा लागल्या होत्या. दरम्यान, नायलॉन मांजाची विक्री शनिवारी देखील सर्रास सुरूच होती.मकरसंक्रांतीनिमित्त नंदुरबारात पतंगोत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी गेल्या महिनाभरापासून तयारी सुरू करण्यात आली होती. सुटीच्या दिवशी सकाळी व सायंकाळी मोठय़ा प्रमाणावर युवक पतंग उडवितांना दिसून येत होते. गेल्या आठ दिवसांपासून तर बाजारात उलाढाल मोठय़ा प्रमाणावर वाढली होती. त्यातच नायलॉन मांजावर बंदी आणण्यात आल्यानंतर स्थानिक कारागिरांना मांजा बनविण्यासाठी मागणी वाढली.बाजारात चौकाचौकात पतंग विक्रीची दुकाने लावण्यात आली आहेत. अगदी पाच रुपयांपासून 500 रुपयांर्पयतच्या पतंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यात विविध आकार व प्रकारातील पतंगांचा समावेश आहे.  साधारणत: 50 हजारांपेक्षा अधीक संख्येने पतंग विक्री होण्याची    शक्यता आहे. येथील व्यापा:यांनी बडोदा, अहमदाबाद, सुरत व इंदोर येथील बाजारातून पतंग खरेदी केल्या आहेत.मांजा बनविण्यासाठी गर्दीनॉयलॉन मांजावर बंदी घालण्यात आल्यानंतर स्थानिक कारागिरांकडे पारंपारिक मांजा बनविण्यासाठी गर्दी होत आहे. अनेक ठिकाणी तर रांगा  लागल्या आहेत. दुकानातून साधा दोराच्या रिळाची खरेदी करून ती कारागिरांकडे दिल्यावर कारागिर मांजा तयार करून देत असतात. मांजा तयार करतांना लाख, काचेचा चुरा, रंग याचा वापर केला जातो. घरगुती पद्धतीने तयार केलेल्या उपकरणावर मांजा तयार केला जातो. दो:याच्या लांबीप्रमाणे अर्थात मिटरप्रमाणे कारागिर मजुरी अकारतो.दरम्यान, नायलॉन दो:यावर बंदी  असतांनाही अनेक विक्रेत्यांनी त्याची सर्रास विक्री केली. यामुळे प्रशासनाने ढिलाई दिल्यामुळेच हे शक्य होत असल्याचेही चित्र होते. दुकान निरिक्षक कार्यालयातील कर्मचारी आणि पालिका कर्मचा:यांनी याबाबत सक्त कार्यवाही करणे आवश्यक असतांना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.