शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शहादा खरेदी केंद्रात 10 दिवसात 950 क्विंटल हरभरा खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 10:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शासनाच्या आधारभूत  खरेदी केंद्रावर गेल्या 10 दिवसात सुमारे 950 क्विंटल हरभरा हमीभावाने खरेदी करण्यात आला. तालुक्यातील 66 शेतक:यांनी आतार्पयत       आधारभूत केंद्रावर हरभरा टाकला आहे. या केंद्रावर मालाची प्रतवारी तपासून खरेदी होत असल्याने शेतक:यांना बाजार समितीत         लिलाव सुरू होण्याची प्रतीक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शासनाच्या आधारभूत  खरेदी केंद्रावर गेल्या 10 दिवसात सुमारे 950 क्विंटल हरभरा हमीभावाने खरेदी करण्यात आला. तालुक्यातील 66 शेतक:यांनी आतार्पयत       आधारभूत केंद्रावर हरभरा टाकला आहे. या केंद्रावर मालाची प्रतवारी तपासून खरेदी होत असल्याने शेतक:यांना बाजार समितीत         लिलाव सुरू होण्याची प्रतीक्षा लागून आहे.शासनाच्या हमी भावाप्रमाणे हरभ:याची खरेदी करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या आठवडय़ात आंदोलन केले होते. संघटनेने बाजार समितीत सुरू असलेल्या हरभरा लिलाव  प्रक्रिया बंद पाडल्यापासून बाजार समितीचा व्यवहार ठप्प झाला           आहे. बाजार समितीतील व्यापा:यांचे परवाने रद्द झाल्याने हमीभाव तर सोडाच कुठल्याही भावाने इतर व्यापारी हरभरा खरेदी करण्यास तयार नसल्याने शेतक:यांची कोंडी झाली आहे. हरभरा हमी भावाने खरेदी करण्यासाठी शासनाचे एकच केंद्र खरेदी-विक्री संघात सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर दररोज सरासरी 100 क्विंटल हरभरा हमी भावाने  खरेदी केला जात आहे. या केंद्रावर हमीभाव मिळत असूनही शेतक:यांकडून मात्र हरभरा आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी आणण्यासाठी निरूत्साह दिसून येत आहे. 5 एप्रिल ते 17 एप्रिलर्पयत या केंद्रावर केवळ           66 शेतक:यांनी 959.50 क्विंटल हरभरा टाकला आहे. या केंद्रावर नाफेडचा एक ग्रेडींग अधिकारी,  मार्केट फेडरेशनचा एक प्रतिनिधी आणि खरेदी-विक्री संघाचा एक प्रतिनिधी अशा त्रिस्तरीय समितीकडून हरभरा खरेदी केली जात आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर हरभरा देण्यासाठी शेतक:यांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी 7/12 उतारा,  आधारकार्ड व बँक पासबुकची ङोरॉक्स खरेदी विक्री संघात जमा करणे आवश्यक असल्याचे खरेदी-विक्री संघाचे मॅनेजर अनिल पाटील यांनी ‘लोकमत’ला माहिती देतांना सांगितले.याच केंद्रावरून यापूर्वी तूर खरेदी झाली होती. तालुक्यातील सुमारे 182 शेतक:यांनी दोन हजार क्विंटल तूर खरेदी केंद्रात हमीभावाने दिली आहे. शहादा व दोंडाईचा येथील वखार महामंडळाचे गोडावून हाऊसफूल असल्याने शहादा केंद्रावर खरेदी होणारा हरभरा नवापूर वखार महामंडळाच्या गोडाऊनला पाठविण्यात येत आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर प्रतवारी तपासून हरभरा खरेदी होत असल्याने खराब प्रतवारीचा हरभरा या केंद्रावर घेतला जाणार नाही ही कल्पना असल्याने कमी प्रतवारीचा हरभरा असलेले शेतकरी बाजार समिती कधी सुरू होते याकडे लक्ष ठेवून आहेत. तसेच  बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या मालाला हमी भावापेक्षा चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा असलेले शेतकरीही बाजार समितीत कधी लिलाव सुरू होतो याकडे डोळे लावून बसले आहेत.