शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापा:यांच्या लुटीच्या घटनांबाबत विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 13:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील तळोदा, निझर, नवापूर, खांडबारा रस्त्यांवर व्यापा:यांना लुटणा:या संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचा बंदोबस्त करावा. याकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील तळोदा, निझर, नवापूर, खांडबारा रस्त्यांवर व्यापा:यांना लुटणा:या संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचा बंदोबस्त करावा. याकडे दुर्लक्ष करणा:या संबधीत पोलीस अधिका:यांवर कारवाई करावी अशा आशयाची लक्षवेधी विधान परिषदेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मांडली आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यात तळोदा, अक्कलकुवा, नवापूर, नंदुरबार व शहादा तालुक्यात मुख्य रस्त्यांवर व्यापा:यांना अडवून त्यांना लुटणे, मारहाण करणे असे प्रकार वाढले आहेत. गेल्या आठवडय़ात देखील तळोदा-प्रकाशा रस्त्यावर नंदुरबारातील चार व्यापा:यांना मारहाण करून त्यांच्याकडील चार लाख रुपयांची रक्कम लुटारूंनी लुटून नेली. वारंवारच्या या घटनांमुळे व्यापारी वर्गात दहशत पसरली आहे. व्यापा:यांनी आमदार रघुवंशी यांना याबाबत साकडे घातले. या पाश्र्वभुमीवर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या विषयावर लक्षवेधी मांडली आहे. 672 क्रमांकाची ही लक्षवेधी लवकरच विधानपरिषदेत चर्चेला येण्याची शक्यता आहे.लक्षवेधी सुचनेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटले आहे की, हातोडा मार्गावर तळोदा, निझर, अक्कलकुवा, खापर परिसरातील व्यापारी नेहमीच वसुलीसाठी व व्यापारासाठी ये जा करतात. याशिवाय नवापूर, विसरवाडी, खांडबारा, बोरद-प्रकाशा मार्गावर देखील व्यापा:यांची नेहमीच ये-जा असते. अशा व्यापा:यांना हेरून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व ऐवज चोरले जात आहे. हे प्रकार संघटीत गुन्हेगारांकडून, त्यांच्या टोळीकडून होत आहे. या टोळ्यांकडे पोलीस विभागाचे जाणूनबुजून दुर्लक्ष आहे. अशा पोलीस अधिका:यांवर कारवाई करावी व लुटमारीचे हे प्रकार तातडीने थांबवावे. या प्रकारांमुळे व्यापारी वर्गात दहशत पसरली आहे. व्यापारावर परिणाम झाला असून बंदचेही आवाहन त्यांनी केले असल्याचे या लक्षवेधीत आमदार रघुवंशी यांनी नमुद केले आहे.