शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

व्यापा:याअभावी कांदा उत्पादक अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 11:35 IST

नंदुरबार : शासनाने कांद्याला प्रती क्विंटल 200 रुपयांचे अनुदान देण्याचे जाहिर केले आह़े यातून शेतक:यांमध्ये आनंद व्यक्त होत असला ...

नंदुरबार : शासनाने कांद्याला प्रती क्विंटल 200 रुपयांचे अनुदान देण्याचे जाहिर केले आह़े यातून शेतक:यांमध्ये आनंद व्यक्त होत असला तरी नंदुरबार जिल्ह्यातील उत्पादक मात्र या अनुदानापासून वंचित आहेत़ नंदुरबार बाजारात कांदा खरेदी करण्यासाठी परवानाधारक व्यापारीच नसल्याने ही समस्या उद्भवली आह़े  हेक्टरी 1 हजार किलोर्पयत कांदा उत्पादन नंदुरबार जिल्ह्यातील शेतक:यांकडून घेण्यात येत़े गेल्या दोन वर्षात दुष्काळामुळे या उत्पादनात घट झाली असल्याने बाजारातील कांदा आवकवर परिणाम झाला आह़े नंदुरबार आणि शहादा तालुक्यात साधारण 1 हजार 500 हेक्टर्पयत लागवड होणा:या कांद्याचे उत्पादन शहादा आणि नंदुरबार येथील बाजार समित्यांच्या आवारातील भाजीपाला मार्केटमध्ये विक्री होत असल्याने त्याची नोंद होत नाही़ परिणामी परवानाधारक व्यापा:याची नियुक्ती याठिकाणी होऊ शकलेली नाही़ शहादा बाजारापेक्षा नंदुरबार येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आह़े याठिकाणी नंदुरबार  तालुक्याच्या पूर्व भागासह साक्री तालुक्यातून कांद्याची मोठय़ा प्रमाणावर आवक होत़े दर न मिळाल्यास कांदा उत्पादक शेतकरी माल घेऊन परत जाण्याचे प्रकारही येथे घडले आहेत़ प्रामुख्याने शेतक:यांकडून येथे हलक्या दर्जाचा (बोथरी) कांदा विक्रीसाठी आणला जातो आह़े या कांद्याला अहमदाबाद आणि इंदौर येथील बाजारापेक्षा कमी दर दिले जात असल्याने अनेकवेळा शेतक:यांचे नुकसान होत़े शेतक:यांनी चांगल्या दर्जाचा कांदा विक्रीसाठी आणल्यास बाजार समितीकडून येथे नियुक्त होणा:या स्वतंत्र कांदा खरेदीदाराची संख्या वाढून नंदुरबार बाजार समिती अधिकृतपणे कांदा बाजारपेठ म्हणून ओळखली जाऊ शकेल़  राज्यात कांदा उत्पादकांनी आंदोलन करुन शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्रतीक्विंटल 200 रुपये अनुदान देण्याची हमी दिली आह़े नंदुरबार येथील उत्पादकांना हे अनुदान मिळण्याची मागणी होऊ लागली असल्याने बाजार समितीने हालचाली सुरु करुन कापूस खरेदी केंद्राप्रमाणेच नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथे खरेदी केंद्र सुरु करण्याची तयारी दर्शवली आह़े