बससेवा नसल्याने विद्याथ्र्याची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 13:05 IST
जागांअभावी प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े
बससेवा नसल्याने विद्याथ्र्याची पायपीट
ऑनलाईन लोकमतरांझणी, नंदुरबार, दि. 21 - सातपुडा पायथ्यालगतच्या विविध गावात बससेवा नसल्याने मुख्यत्वे विद्यार्थिनींना शिक्षणासाठी चार-पाच किमी पायपीट करावी लागत आह़े त्यामुळे ब:याच युवतींची मध्यतरीच शिक्षण सोडण्याची वेळ येत असल्याची स्थिती आह़े तसेच संबंधित विद्याथ्र्याना वसतीगृहांमध्येही पुरेशा जागांअभावी प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े जुने गोपाळपूर येथील विद्यार्थिनी दोन किमी अंतर पायपीट करीत तर जीवननगर पुनर्वसन येथील विद्यार्थिनी तीन किमी अंतर पायपीट करीत रांझणी येथून बसने प्रवास करीत असतात़ तोलाचापाडा येथील विद्यार्थिनी चार किमी वरपाडा येथील विद्यार्थिनी दीड किमी तर, जांबाई येथील विद्यार्थीनी चार किमी, व पाडळपूर येथील विद्यार्थिनी पाच किमी अंतर रोज पायपीट करीत असतात़ त्यामुळे विद्यार्थिनीची गळती होत असल्याचे सांगण्यात येत आह़े जाण्या-येण्याची सोय नसल्याने हुशार होतकरू विद्यार्थिनीही शाळेत जाण्यापासून वंचित राहत असल्याचे यातून दिसून येत आह़े त्यामुळे आदिवासी विकास विभागाने संबंधित वसतिगृहांना वसतिगृहात प्रवेश देण्यास प्राधान्य द्यावे अशी मागणी सातपुडा पायथ्यालगतच्या गावातील पालक व विद्याथ्र्याकडून करण्यात येत आह़े