शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बेडकी शिवारातील ऑईल कारखान्यामुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राष्ट्रीय महामार्गालगत बेडकी शिवारातील टायर जाळून व वापरलेल्या ऑईलपासून डिङोल तयार करण्याच्या कारखान्यामुळे लगतच्या गावातील शेतक:यांच्या जमिनीचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत  असल्याने हा कारखाना बंद करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. नवापूर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत बंधारफळी ग्रामपंचायतअंतर्गत बेडकी शिवारात वाहनांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राष्ट्रीय महामार्गालगत बेडकी शिवारातील टायर जाळून व वापरलेल्या ऑईलपासून डिङोल तयार करण्याच्या कारखान्यामुळे लगतच्या गावातील शेतक:यांच्या जमिनीचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत  असल्याने हा कारखाना बंद करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. नवापूर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत बंधारफळी ग्रामपंचायतअंतर्गत बेडकी शिवारात वाहनांचे जुने टायर व वाहनांमधे           वापर झाल्यानंतर काढण्यात  येणा:या ऑईलपासून डिङोल तयार करण्याचा कारखाना उभारण्यात आला आहे. नुकताच याच राष्ट्रीय महामार्गावर शहर हद्दीत बेकायदेशीरपणे केमिकलचा वापर करून डांबर बनवण्याचा काळा धंदा उघडकीस आला आहे. बेडकी शिवारात नागरिकांच्या विरोधाला न जुमानता वाहनांमधून काढलेल्या जुन्या ऑईलमध्ये  केमिकल टाकून इंधन ऑईल बनवणे व वाहनांचे जुने टायर जाळून ऑईल निर्मिती करणारा कारखाना सुरू असून, या कारखान्यामधून निघणा:या ऑईलमुळे अनेक शेतक:यांच्या कूपनलिकेत ऑईलमिश्रित पाणी येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. यामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असून, जुने टायर   जाळले जात असल्याने त्यातून निघणा:या धुरामुळे आणि दरुगधीमुळे नदीलगत असलेल्या वाकीपाडा, करंजी व बेडकी या गावातील नागरिकांना श्वास व दम्यासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे, या आशयाच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा कारखान्यामुळे 90 टक्के प्रदूषण होत असल्याने गुजरात राज्यात अशा उद्योग उभारणीवर संपूर्ण बंदी असल्याने तेथील व्यापारी आपला उद्योग गुजरात-महाराष्ट्र सीमेवर करीत असल्याचा सूर उमटत  आहे. याच कारखान्याच्या विरोधात करंजी खुर्द येथील नागरिकांनी सरपंचांकडे मागणी करून नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेला कारखाना प्रशासनाकडून त्वरित बंद करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तालुका लोकशाही दिनातही सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले  यांनी याविषयीची तक्रार दाखल करून नागरिकांच्या जीवाशी खेळणा:या अशा उद्योगांवर                 कायमची बंदी आणण्याची मागणी केली आहे. नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांचेही या ज्वलंत समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रय} झाला आहे.