शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणासाठी सर्वस्तरीय नागरिकांचा गट बांधणार बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुष्काळामुळे पाणीटंचाई आणि नापिकी सोसणा:या तळोदा तालुक्यात सर्वस्तरातील नागरिक एकत्र येऊन जलसंधारणाची विविध कामे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुष्काळामुळे पाणीटंचाई आणि नापिकी सोसणा:या तळोदा तालुक्यात सर्वस्तरातील नागरिक एकत्र येऊन जलसंधारणाची विविध कामे करणार आहेत़ या कामांना लोकवर्गणी आणि लोकसहभागाची जोड दिली जाणार असून याबाबत परवानगी मिळावी म्हणून नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत परवानगी मागितली आह़े निवेदनात, तळोदा तालुक्यातील भूजल पातळी गेल्या काही वर्षात 800 फूटार्पयत खोल गेली आह़े यामुळे तालुक्यात प्रथमच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आह़े यातून विविध प्रश्न निर्माण झाले आहेत़ यावर मात करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन लोकचळवळ चालवली आह़े यातून लोकवर्गणी व सहभाग देत विविध उपक्रम होणार आहेत़ यात पाणी जिरवण्यासाठी नद्यांची नांगरटी करणे, नद्या, शासकीय किंवा निमशासकीय जागांवर विविध आकारमानाचे खड्डे करण्यासाठी परवानगी, तळोदा शहरातील शासकीय, खाजगी, सार्वजनिक कूपनलिका व विहिरींचे पुर्नभरण करणे, गाव तलावातील गाळ काढून खोली वाढवणे, पावसाळ्यात वाहून जाणा:या पाण्याची गती कमी करण्यासाठी व जलसाठा व्हावा म्हणून नद्या, नाले, ओढे यांच्या प्रवाहात गॅबियन बंधारे बांधण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आह़े सोबतच शासकीय तांत्रिक सहाय्य आणि विविध प्रकारचे वाहतूक परवाने देण्याची मागणीही करण्यात आली आह़े निवेदनावर प्रा़ मित्तलकुमार टवाळे, लवकुमार नथ्थू पिंपरे, विजय सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, विजय पाडवी, चेतन इंगळे, सम्राट महाजन, राजेश माळी, दिलीप मोरे, अंबालाल साठे, प्रा़ज्योत्सना काशीनाथ पिंपऱे पंकज तांबोळी, अशोक तुकाराम वाघ, मुकेश प्रताप कापुरे, महेश तुळशीराम माळी, प्रकाश श्रीराम माळी, सुशिलकुमार सूर्यवंशी, वसंत मराठे, पंकज राणे यांच्यासह शहरातील नागरिकांच्या सह्या आहेत़