शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी यांत्रिकीकरणातही जिल्ह्यात बैलबाजार टिकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेती उत्पादन वाढीसाठी शेतकरी यंत्रांचा अधिक वापर करुन लागल्याने पारंपरिक शेतीसाधनांच्या बाजारपेठेला घरघर लागली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेती उत्पादन वाढीसाठी शेतकरी यंत्रांचा अधिक वापर करुन लागल्याने पारंपरिक शेतीसाधनांच्या बाजारपेठेला घरघर लागली आह़े परंतू जिल्ह्यात बैल बाजारांच्या बाबतीत याउलट स्थिती असून 2018-19 या वर्षात तीन ठिकाणी भरणा:या बैल बाजारांमधून गेल्या वर्षभरात 25 कोटींची उलाढाल झाली आह़े       पारंपरिक शेतीसाठी ओळखल्या जाणा:या नंदुरबार जिल्ह्यात गत 15 वर्षात कृषी यांत्रिकीकरणाचे महत्त्व वाढले आह़े सधन शेतक:यांनी मोठय़ा आणि छोटय़ा ट्रॅक्टरांची खरेदी झाली आह़े मात्र सामान्य शेतकरी बैलांच्या सहाय्यानेच शेती कसत असल्याने पारंपरिक शेतीचे मूल्य टिकून आह़े परिणामी बैलबाजारांमध्ये होणारी उलाढालही कायम असल्याचे जिल्ह्यातील नंदुरबार, तळोदा आणि अक्कलकुवा येथील बैलबाजारात झालेल्या खरेदी विक्रीतून दिसून आले आह़े 2018-19 या आर्थिक वर्षात सर्वाधिक 11 हजार पशुधनाची विक्री ही एकटय़ा तळोदा येथील बैलबाजारातून झाली असून उलाढालीचा आकडा कोटींच्या घरात आह़े त्याखालोखाल अक्कलकुवा येथील बाजारपेठेत 7 कोटी रुपयांच्या पशुधनाची खरेदी विक्री झाली आह़े  नंदुरबार बाजारातही वर्षभरात दोन कोटी रुपयांचा खरेदी विक्रीचा व्यवहार झाला आह़े विशेष म्हणजे तिघी बैलबाजारात खरेदी करण्यात आलेल्या बैलांची खरेदी ही शेतक:यांनीच केली आह़े या बाजारांमध्ये फक्त शेतक:यांनाच बैल विक्री करण्याची सक्ती केली जात़े बैलांसोबतच शेळ्या, म्हशी आणि गायींची विक्रीतूनही मोठी उलाढाल झाल्याची माहिती आह़े 

जिल्ह्यात बैलांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या तळोदा येथे आजअखेरीस 15 हजार बैलांची आवक झाली होती़ यातील 11 हजार 385 बैलांची विक्री होऊन 12 कोटी 45 लाख 88 हजार 200 रुपयांची उलाढाल झाली़ बाजार समितीला 12 लाख 45 हजार रुपयांचा महसूल मिळाला़ याठिकाणी 6 हजार 229 शेळ्यांच्या विक्रीतून 93 लाख रुपयांची उलाढाल झाली़ नंदुरबार कृषी उत्पन्न बाजाराच्या आवारात दर मंगळवारी बैल बाजार भरवण्याची परंपरा आह़े 2018-19 या आर्थिक वर्षात 780 बैलांची आवक झाली होती़ त्यातील 250 बैलांची विक्री होऊन 21 लाख 59 हजार रुपयांची उलाढाल झाली़ बैल बाजार थंडावला असताना 10 हजार 877 शेळ्यांच्या खरेदी-विक्रीतून 2 कोटी 24 लाख 90 हजार रुपयांची उलाढाल झाली़ 93 म्हशींच्या विक्रीतून 37 लाख रुपयांची उलाढाल झाली़4अक्कलकुवा येथे आजअखेरीस 6 हजार 107 बैलांच्या विक्रीतून 5 कोटी 60 लाख 90 हजार रुपयांची उलाढाल झाली़ तळोदा आणि अक्कलकुवा या दोन्ही ठिकाणी किमान एक लाख रुपयांर्पयत बैल जोडय़ा विकल्या गेल्याची माहिती आह़े 

जिल्ह्यातील सधन शेतक:यांचा तालुका म्हणून परिचित असलेल्या शहादा बाजार समितीतील बैल बाजारात 10 वर्षापूर्वी मोठी उलाढाल होत होती़ परंतू गेल्या दोन वर्षात येथील व्यवहार पूर्णपणे बंद झाली आह़े पशुधन खरेदी-विक्रीचे किरकोळ व्यवहारही होत नसल्याने येथील उलाढाल पूर्णपणे बंद आह़े परिणामी तालुक्यातील छोटे शेतकरी तळोदा किंवा खेतिया येथून बैल खरेदी करुन आणत असल्याचे चित्र आह़े