शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलची सेवा 15 दिवसांपासून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : अक्कलकुवा तालुक्यात बीएसएनएल सेवा गेल्या 15 दिवसांपासून बंद झाली असून त्यामुळे या सेवेवर अवलंबून ...

लोकमत न्यूज नेटवर्कखापर : अक्कलकुवा तालुक्यात बीएसएनएल सेवा गेल्या 15 दिवसांपासून बंद झाली असून त्यामुळे या सेवेवर अवलंबून असलेली ब्रॉडबँड सेवा बंद असल्याने बँकेच्या व्यवहारांवर परिणाम झाला आहे. मोबाईल सेवेसह दूरध्वनी सेवाही ठप्प झाल्याने तालुक्यातील जनतेचा जगाशी संपर्क तुटल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिका:यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.अक्कलकुवा तालुक्यात एक हजारावर बीएसएनएलचे दूरध्वनी ग्राहक आहेत त्यातील बहुसंख्य ग्राहकांनी ब्रॉडबँड सेवा घेतली आहे. गेल्या 15 दिवसांपासून ही सेवा पूर्णत: बंद असल्याने त्यांचे व्यवसाय पूर्णत: बंद पडले आहेत. त्यामुळे त्यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.  बीएसएनएलच्या कनेक्टीव्हीटीअभावी स्टेट बँक, सेंट्रल बैंक, जिल्हा मध्यवर्ती बँक, टपाल कार्यालय, सायबर सेवा आदींचे कामकाज ठप्प पडल्यामुळे जनतेच्या अत्यावश्यक गरजा प्रभावित झाल्या आहेत. तसेच विद्याथ्र्याचे दाखले, ऑनलाईन अर्ज, शासकीय योजनांची माहिती, विद्यार्थी पोर्टलवरील माहिती भरणे या सर्व गोष्टींवर परिणाम झाला असून याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही अधिकारी लक्ष देत नसल्याने जनतेत या विभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.ग्रामीण भागातील नागरिकांचे हालशासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व विविध शासकीय दाखले ऑनलाईन मिळत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक खापर किंवा अक्कलकुवा येथे येतात. मात्र कनेक्टीव्हीटीअभावी कामे होत नसल्याने त्यांना दररोज चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांना प्रवासाचा आर्थिक भारही सहन करावा लागत आहे.अक्कलकुवा येथील कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी रहात नसल्याने तक्रार कोणाकडे करावी हा कायमचा प्रश्न आहे. ब:याचा           तळोदा कार्यालयात तक्रार करावी लागते. त्याचप्रमाणे अक्कलकुवा, खापर व मोलगी येथील ऑपरेटर नसल्याने तेथे तात्पुरते नेमण्यात आलेले अकुशल कामगारांना दूरध्वनीचा बिघाड दुरूस्त करणे जमत नाही. त्यामुळे ग्राहकांची परवड होत आहे. त्या ऑपरेटर्सना गेल्या आठ महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळेही सेवेत व्यतय येत असल्याची तक्रार आहे. त्याचप्रमाणे तालुक्यात विजेचा लपंडाव हा नेहमीचा असून तास दोन तास वीजपुरवठा बंद पडल्यास बीएसएनएलची सेवा बंद पडते. बॅटरी रिचार्ज करण्यासाठी असलेल्या जनरेटरचा वापर केला जात नसून जनरेटर केवळ ‘शो-पीस’ झालेले आहेत. त्यामुळे जनतेची मोठी गैरसोय होत असून 15 दिवसांपासून सेवा बंद असूनही वरिष्ठ लक्ष देत नसल्याने जनतेने तक्रार कुठे           करावी? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत असून वरिष्ठांनी लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.