शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन तालुक्यांचा सेतू ठरतो धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 13:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या व अक्कलकुवा व धडगाव या दोन तालुक्यातंना जोडणारा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या व अक्कलकुवा व धडगाव या दोन तालुक्यातंना जोडणारा पुलाची उदय नदीच्या पुरात नेहमीच नासधुस झाली. मागील अतिवृष्टीत मात्र हा पूल पूर्णत: पोखरला गेला आहे. शिवाय कठडे तुटल्यामुळे हा पूल वाहतुकीला धोक्याचा ठरत आहे. हा धोका टाळण्यासाठी तेथे नवीन पुलाची आवश्यकता भासत आहे.धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात झालेल्या मुख्य रस्त्यांमध्ये असली ते धडगाव व डाबमार्गे असली ते अक्कलकुवा या या रस्त्याचाही समावेश आहे. या मार्गावर १९९० च्या कालावधीत असली गावाजवळ उदय नदीवर पुल बांधण्यात आला. त्यामुळे अक्कलकुवा व धडगाव हे दोन तालुके जोडले गेले. या पुलाच्या माध्यमातूनच या दोन्ही तालुक्यांमधील नागरिकांना वाहतुकीची सुविधा निर्माण झाली आहे. परंतु नदीला येणाऱ्या पूराच्या प्रवाहाच्या दृष्टीने या पुलाची रचनाच काही अंशी चुकीची ठरते. त्यामुळे वाहतुक सविधेला धोका निर्माण झाला आहे.अनेक नदी-नाल्यांमधून तयार झालेली उदय नदी ही या दोन्ही तालुक्यांमधून वाहणारी व नर्मदा नदीची सर्वात मोठी नदी आहे. या नदीला दर पावसाळ्यात मोठा पूर येत असतो. त्या पुरपातळीच्या तुलनेत या पुलाची उंची अत्यंत कमी ठेवण्यात आली. त्यामुळे उदय नदीला आलेला प्रत्येक पूराचे पाणी या पुलावरुनच जाते. त्यात पुलाच्या कठड्याची पुर्णत: दुरवस्था झाली. त्यामुळे हा पूल काही वर्षांपासून वाहतुक सेवेला धोक्याचा ठरतो.हा धोका कायम असतानाच मागील पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे या पुलाच्या ओघवता भाग पूर्णपणे पोखरला गेला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतुकीला दुहेरी धोका निर्माण झाला आहे. हा धोका तथा संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या ठिकाणी पुराच्या तुलनेत नवीन उंच पूल बांधण्याची नितांत आवश्यकता आहे. हा मार्ग त्यामुळे संबंधित यंत्रणेमार्फत या दोन्ही तालुक्यातील नागरिकांच्या सुविधेसाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमार्फत करण्यात येत आहे.

पूल पूर्णपणे पोखरला गेल्यामुळे पुढील पावसाळ्यात हा पूल तुटण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना व वाहतुकीची होणारी गैरसोय टाळण्यासाठी या ंिंठकाणी नवीन पूल निर्माण होणे अत्यावश्यक आहे.या ठिकाणी नवीन पूल तयार करण्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूला उंच भाग असल्यामुळे पूल निर्मितीसाठी अतिरिक्त भरावाची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे हे ठिकाण नवीन पुलासाठी अनुकूल आहे.नवीन पुलाची मागणी करतांना दोन्ही तालुक्यांमधील नागरिकांमार्फत पुराच्या तुलनेत व सुरक्षेसाठी समाधानकारक उंचीचा पूल असावा, अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात येत आहे.दिवाळीच्या कालावधीत मोठी यात्रा भरणाऱ्या अस्तंबा या गावाकडे जाण्यासाठी देखील हाच पूल सोयीस्कर ठरतो. तेथे जाणाºया भाविकांची संख्या अधिक राहत असून त्यांची सुरक्षा व सोयीसाठी येथे नवीन पुलाची आवश्यकता आहे.