शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

शिधापत्रिकासाठी लाभाथ्र्याचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : लाभाथ्र्याना विविध योजनांच्या लाभासाठी तर विद्याथ्र्याना दाखल्यांच्या पूर्ततेकरीता शिधा पत्रिकांची अत्यंत आवश्यकता भासत असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : लाभाथ्र्याना विविध योजनांच्या लाभासाठी तर विद्याथ्र्याना दाखल्यांच्या पूर्ततेकरीता शिधा पत्रिकांची अत्यंत आवश्यकता भासत असून, या शिधापत्रिका मिळविण्यासाठी संबंधीत पुरवठा शाखेकडे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. मात्र एवढे करूनही त्यांना निराश होऊन परतावे लागत असल्याची त्यांची व्यथा आहे. दरम्यान प्रशासनाकडेदेखील मोठय़ा प्रमाणात रेशनकार्ड स्वाक्षरी अभावी पडून असल्याचे लाभाथ्र्याचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने विद्याथ्र्याच्या पुढील प्रवेशाच्या पाश्र्वभूमिवर तातडीने शिधापत्रिका द्याव्यात अशी मागणी आहे.केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबरोबरच विद्याथ्र्याच्या उत्पन्न व जातीच्या दाखल्यांसाठी कोणत्याही प्रकारच्या शिधापत्रिकांची आवश्यकता असते. तथापि या शिधापत्रिकाच जवळ नसल्यामुळे नाईलाजास्तव कागदपत्रांची पूर्तता करणे अशक्य झाले आहे. परिणामी नागरिकांना योजनांपासून वंचित  राहावे लागत आहे. वास्तविक गेल्या अनेक महिन्यांपासून लाभार्थी व पालकांनी नवीन रेशनकार्ड व दुय्यम कार्डासाठी संबंधीत पुरवठा        शाखेकडे प्रकरणे दाखल केली आहेत. मात्र त्यांना तत्काळ मिळण्याऐवजी अजूनही प्राप्त झालेली नाही. कार्डाकरीता रोजच हे लाभार्थी खेडय़ावरून येवून संबंधीतांकडे थेटे घालत आहेत. त्यांना उद्या या, पर्वा या, साहेबांची स्वाक्षरी बाकी आहे, असे उत्तरे मिळत असतात. त्यामुळे हेलपाटे मारून लाभार्थी अक्षरश: वैतागले आहेत. आधीच  तीन ते चार महिन्यांपासून पुरवठा शाखेकडे शिधापत्रिकांची वानवा होती. विशेषत: केशरी रंगाच्या शिधापत्रिका नव्हता. याच प्रकारच्या शिधापत्रिकांची मोठी मागणी होती. आता त्याही प्रशासनाकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्या असतांना तातडीने मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. सद्या केंद्र शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजनेच्या सहज मिळणा:या लाभामुळे केशरी रंगाची शिधापत्रिकांची अधिक गरज भासत असते.प्रशासनाचा दाखला ही चालत असल्या तरी या योजनेशी संबंधीत खाजगी दवाखाने शिधापत्रिकाचाच आग्रह धरत असतात. अशा वेळी संबंधीत रुग्णांच्या नातेवाईकांना निराश व्हावे लागत असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली. शासनाने महागडय़ा आजारांवर रुग्णांना भरीव मदत उपलब्ध करून दिली असली तरी लाल फितीच्या उदासिनतेमुळे वंचित राहावे लागत असल्याचा आरोप लाभार्थ्ीनी केला आहे. सद्या दहावी-बारावीचे निकाल लागले आहे. पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाची लगबगही विद्याथ्र्यामध्ये सुरू आहे. साहजिकच त्यांना उत्पन्न, जातीचा दाखल्यांची पूर्तता करावी लागणार आहे. परंतु रेशनकार्डामुळे त्यांच्यापुढे अडचणी निर्माण होत  आहे. दरम्यान प्रशासनाकडेही पुरवठा शाखेने जवळपास दीड, 200 प्रस्ताव  पाठविले आहेत. मात्र स्वाक्षरी  अभावी ते तसेच धुळखात पडले आहे. निदान प्रभारी प्रशासनाने तरी तेथे पडलेली प्रकरणांची पडताळणी  करून निकाली काढावीत अशी लाभाथ्र्याची मागणी आहे. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. 

लाभार्थ्ीनी रेशनकार्डसाठी पुरवठा शाखेकडे प्रकरणे दाखल केले असले तरी विविध त्रुटींमुळे साधारण 150 प्रस्ताव नाकारण्यात आले असून, ते तशीच महिनाभरापासून धुळखात पडल्याचे सूत्रांनी सांगितले. कागदपत्रांच्या पूर्तता करण्यासाठी संबंधितांना अनेक वेळा सूचना दिल्या आहेत. या उपरांतही त्यांनी कागदपत्रे आणून दिलेले नाही. असेही पुरवठा शाखेतील सूत्रांनी सांगितले. वास्तविक संबंधीत ग्राहकांनीही कागदपत्रांची पूर्तता करणे अपेक्षित आहे.