शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

ग्रामपंचायतींसाठी सज्ज झालेल्या इच्छुकांच्या तयारीला जातवैधतेच्या सक्तीने लावला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यातील १९ जिल्ह्यात १ हजार ५०० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील १९ जिल्ह्यात १ हजार ५०० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे़ यात नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुक्यामधील ३८ ग्रामपंचायती समाविष्ट आहेत़ शुक्रवारपासून अर्ज भरण्याची मुदत सुरु झाली असली तरी शासनाने गेल्या वर्षी काढलेल्या जातपडताळणी प्रमाणपत्राच्या अटीचा या निवडणूकीसाठी इच्छुकांना फटका बसला असून अनेकांचे स्वप्नही धुळीस मिळाले आहे़जिल्ह्यातील शहादा, तळोदा, धडगाव आणि नवापुर या चार तालुक्यात निवडणूक कार्यक्रम लागू करण्यात आला आहे़ सर्व ३८ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे़ यांतर्गत शुक्रवारपासून तालुकास्तरावर अर्ज भरण्यासाठी कक्षांची निर्मिती करण्यात आली आहे़ यात सर्वाधिक ग्रामपंचायती ह्या धडगाव तालुक्यात आहेत़ बहुतांश सदस्य आणि लोकनियुक्त सरपंच पदासाठी जागा ह्या अनुसुचित जमातींसाठी राखीव आहेत़ यामुळे सहज निवडणूक लढवली जाईल असा सर्वांचाच समज होता़ या समजावर २० सप्टेंबर २०१९ रोजी राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या अध्यादेशांमुळे पाणी फेरले गेले आहे़या आदेशानुसार राखीव जागेसाठी इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे़ या निर्णयाची बऱ्याच ठिकाणी माहिती नसल्याने शुक्रवारी इच्छुकांचा गोंधळ उडाल्याचे दिसून आले़ यातून काहींनी पर्यायी मार्ग काढत इतरांना तयार करुन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता़दरम्यान येत्या १३ मार्चपर्यंत जातवैधता प्रमाणपत्राविना अर्ज दाखल करणाऱ्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे़४शहादा तालुक्यातील असलोद, न्यू असलोद, राणीपूर, नागझिरी आणि कोटबांधणी, तळोदा तालुक्यातील बंधारा, राणीपूर, पाडळपूर, नवापुर तालुक्यातील धनराट, धुळीपाडा, वडकंळबी, उकळापाणी, रायंगण, कोठडा, नांदवण, उमराण, केडापाडा, बंधारपाडा, केळी, ढोंग, पळसून आणि सागाळी, धडगाव तालुक्यातील धनाजे बुद्रुक, भोगवाडे खुर्द, उमराणी बुद्रुक, घाटली, खामला, काकरदा, आचपा, मुंदलवड, मनवाणी, खर्डा, सिसा, काकरपाटी, पाडली़ वरखेडी बुद्रुक, कुंडल आणि हातधुई या ग्रामपंचायतीत निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे़६ ते १३ मार्च दरम्यान नामनिर्देशन करुन अर्जांची छाननी १६ मार्च रोजी होणार असून १८ रोजी माघारीची अंतीम मुदत आहे़ मतदान केंद्रांवर २९ मार्च रोजी मतदान होणार आहे़एकीकडे जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती अस्वस्थता करत असताना दुसरीकडे पाच दिवसांचा आठवडाही मारक ठरण्याची चिन्हे आहेत़ अर्ज दाखल करण्याच्या वेळेत शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस सलग सुट्या आल्या आहेत़ त्यातही १० रोजी एक दिवस सुटी असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी चारच दिवस मिळणार आहेत़