लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील शिरुड रस्त्यावर असलेल्या तापी रेसिडेंसी परिसरात बंद घर फोडुन चोरटय़ांनी 15 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहेशहरापासून साधारण दोन ते तीन कि. मी. अंतरावर या वसाहती असुन तापी रेसिडेंसी मध्ये वास्तव्यास असलेले मधुकर पटेल हे प}ी व कुटुंबासहीत गुजरात राज्यात देव दर्शनाला गेले होते . चोरटय़ांनी घर बंद असल्याचे पाहुन दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. घरातील रोख पंधरा हजार व साधा भ्रमणध्वनी घेवुन फरार झाले . सकाळी वास्तव्यास असलेल्या वॉचमनचा ही बाब लक्षात आली त्याने पाटील यांना चोरीची माहिती दिली. पाटील कुटुंबासह लागलीच परतले व पोलीसाना पाचारण केले . रात्री उशीरा पयर्ंत पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते . या अगोदर देखील पाटील यांच्या घरा शेजारी पाच सहा महिन्यापुर्वी चोरी होवून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती. वारंवार होत असलेल्या घटनांमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहाद्यात पुन्हा धाडसी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:14 IST