शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बिबटय़ाच्या बछडय़ाला बॉईल अंडी व दुधाचा पाहुणचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:58 IST

मोहिदा शिवार : ट्रॅप कॅमे:याच्या माध्यमातून बिबटय़ावर ठेवले जातेय लक्ष, ग्रामस्थांमध्ये भिती

बोरद : तळोदा तालुक्यातील कळमसरे मोहिदा शिवारात शनिवारी बिबटय़ाचा बछडा सापडला होता़ सध्या बछडय़ाची प्रकृती उत्तम असून त्याला वनखात्याच्या देखरेखीखाली ठेवण्यात येत आह़े बॉईल अंडी, शेळीचे दूध, ग्लुकोज आदींचा पाहुणचार बछडय़ाला देण्यात येत आह़े बिबटय़ाचा बछडा सापडल्यानंतर वनविभागाकडून त्याला रात्री आहे त्याच ठिकाणी ठेवून देण्यात आले होत़े रात्री मादा बिबटय़ा येईल व बछडय़ाला घेऊन जाईल असा अंदाज वनखात्याकडून व्यक्त करण्यात आला होता़ परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही़ बिबटय़ा रात्रभर त्याच ठिकाणी राहिला़ त्यामुळे वनखात्याकडून त्याला सुरक्षित ठिकाणी नेत त्याच्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली़ बिबटय़ाची प्रकृती उत्तम असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आह़ेमोहिदा शिवारातील मनोज नरोत्तम पाटील यांच्या उसाच्या शेतात शनिवारी बिबटय़ाचा बछडा सापडल्याने एकच खळबळ उडाली होती़ परिसरात बिछडा सापडल्याने नक्कीच बिबटय़ाचा येथे वावर असल्याने ग्रामस्थांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े बछडय़ाला दुसरीकडे हलवले असते तर, बिबटय़ा चवताळला असता या भितीने बछडय़ाला रात्रभर त्याच ठिकाणी ठेवण्यात आले होत़े तसेच रात्री झाडांवर ट्रॅपींग कॅमेरेही लावण्यात आले होत़े या ठिकाणी वनखात्याचे अधिकारी व कर्मचारीही ठाण मांडून होत़े परंतु रात्रभर वाट पाहिल्यावरसुध्दा बिबटय़ा आपल्या बछडय़ाला घ्यायला आला नसल्याने अखेरीस वनखात्याने सकाळी बछडय़ास दुसरीकडे नेत त्याचा पाहुणचार केला़ तळोदा येथे तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ़ किशोर सामुद्रे यांनी बछडय़ाची तपासणी करुन तो ठणठणीत असल्याचे सांगितल़े दरम्यान, परिसरात अजून बिबटय़ाचे बछडे आहे काय याचा वनविभागाकडून शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आल़े त्यासाठी ग्रामस्थांची मदत घेतली जात आह़े शिवाय झाडांवर ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली़