शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
3
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
4
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
6
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
7
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
8
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
9
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
11
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
12
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
13
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
14
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
15
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
16
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
17
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
18
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
19
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
20
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 22:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे नंदुरबार येथील वृद्ध तर विसरवाडी येथील महिलेचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ दिवसभरात १५ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे नंदुरबार येथील वृद्ध तर विसरवाडी येथील महिलेचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ दिवसभरात १५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे़ जिल्ह्यातील बाधितांची संख्या २८७ तर मृतांची संख्या १४ झाली आहे़नंदुरबार शहरातील जयवंत चौकात राहणाऱ्या ७१ वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मंगळवारी सकाळी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला़ सकाळी वृद्धासोबत अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या विसरवाडी येथील ५२ वर्षीय महिलेचा रात्री कोविड कक्षात उपचार सुरू असताना मृत्यू झाला़ दरम्यान दिवसभरात नंदुरबार शहरात आठ, शहादा येथे सहा तर विसरवाडी ता़ नवापूर येथील महिलेचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला़ होता़ यात नंदुरबार आणि विसरवाडी येथील मयत झाली असून उर्वरित १३ जणांवर कोविड कक्षात उपचार सुरू करण्यात आले आहेत़ सोमवारी रात्री उशिरा व मंगळवारी संपूर्ण दिवसात २१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ मंगळवारी सकाळी विसरवाडी येथील ५२ वर्षीय महिला आणि नंदुरबार शहरातील भोई गल्लीत राहणाऱ्या ५२ वर्षीय महिलेचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता़ सायंकाळी नंदुरबार शहरातील सहा तर शहादा येथे सहा जणंचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत़ यात नंदुरबार शहरातील देसाईपुरा, गवळीवाडा, तुलसीविहार, दत्तकॉलनी, पळाशी ता़ नंदुरबार येथील प्रत्येकी एक, शहादा शहरातील ३, जयनगर, गुजरगल्ली, सरदार रेसीडेन्सी येथील प्रत्येकी एक अशा एकूण १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या २८७ असून यातील १७४ रुग्ण हे कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत़ जिल्हा रुग्णालय, एकलव्य रेसिडेन्शियलच्या कोविड कक्षात सध्या ८१ रुग्ण उपचार घेत आहेत़ जिल्ह्यात १० रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे़सोमवारी आणि मंगळवार या दोन दिवसात खोंडामळी ता़ नंदुरबार, नंदुरबार शहरातील पंचायत समिती, सरस्वती नगर, रेल्वे कॉलनी, गांधीनगर, मंगल बाजार, गिरीविहार सोसायटी, कोकणी हिल व भट गल्ली, मोलगी ता.अक्कलकुवा, लोणखेडा ता.शहादा तसेच शहादा येथील सदाशिव नगर, कल्पना नगर, साईबाबा नगर, वृंदावन नगर, गांधीनगर व मोहिदे ता.शहादा येथील प्रत्येकी १ तर कुकडेल मराठा गल्ली शहादा आणि मिरा कॉलनी तळोदा येथील प्रत्येकी २ रुग्ण असे एकूण २१ तण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत़