शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

नंदुरबार जिल्ह्यात कृत्रिम रेतनातून सात हजार गायी म्हशींचा जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 13:29 IST

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाकडून गेल्यास सहा महिन्यांपासून देशी गोवंश वाढीसाठी अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम हाती घेतला आह़े यातून राज्याच्या त्या-त्या भागातील देशी गायी आणि बैल यांचे अस्तित्व कायम राहून त्यांची संख्या वाढ व्हावी म्हणून प्रयत्न होत आहेत़ यांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात तापी खिलार, गीर यांची वाढ करण्यासाठी प्रयत्न होत ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाकडून गेल्यास सहा महिन्यांपासून देशी गोवंश वाढीसाठी अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम हाती घेतला आह़े यातून राज्याच्या त्या-त्या भागातील देशी गायी आणि बैल यांचे अस्तित्व कायम राहून त्यांची संख्या वाढ व्हावी म्हणून प्रयत्न होत आहेत़ यांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात तापी खिलार, गीर यांची वाढ करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी शासनाचे धोरण जाहिर होण्याच्या दोन वर्ष आधीपासून जिल्ह्यात कृत्रिम रेतनातून तापी खिल्लार आणि गीर यांचे संवर्धन झाले आह़ेजिल्ह्यात गेल्या दोन वर्षात कृत्रिम रेतन पद्धतीद्वारे तब्बल सात हजार गायी आणि म्हशी जन्मास आल्या आहेत़ पशुसंवर्धन विभागाने सातत्याने केलेल्या कामकाजातून जन्मास आलेल्या गायी म्हशींमुळे गुरांच्या संख्येत भर पडली आह़े  यातही खिलारी आणि गावठी पशुंच्या प्रजातीच्या संवर्धनाला मोठा हातभार लागला आह़े जिल्ह्यातील 74 कृत्रिम रेतन केंद्रांच्या माध्यतातून सात हजार 104 गायींचे वासरू आणि म्हशींचे पारडू यांची निर्मिती झाली आह़े निसर्ग नियमाला फाटा देऊन हे कामकाज सुरू असले तरीही जिल्ह्यातील पशुंच्या मूळ प्रजातींच्या जनावरांच्या संवर्धनासाठी उपयोगी असल्याने पशुपालकही त्याला सहमती देत आहेत़ शासनाच्या गोवंश वाढ कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील विविध भागात गीर आणि डांगी या गायींच्या वंशातही वाढ होत असून पशुपालक किमान 2 गीर गायींचा वंश वाढवत असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आह़े जिल्ह्यात श्रेणी एकचे 48 तर श्रेणी दोनचे 35 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत़ यात एक फिरता दवाखाना आह़े या दवाखान्यांद्वारे नंदुरबार 19, नवापूर 19, शहादा 13, तळोदा 7, अक्कलकुवा 8 तर धडगाव तालुक्यात 8 अशा 74 केंद्रातून गायी म्हशींचे रेतन करण्यात येत़ेजिल्ह्यात खासकरून दुग्धोत्पादनासाठी गायी किंवा म्हशींची गरज असल्याने बरेच पशुपालक हे जर्सी गाय किंवा सुरती व मु:हा म्हशींचा संकर करण्याची तयारी दर्शवतात़ यात अनेक जण गीर गायींना पसंती देतात़ रेतन पद्धतीत असा प्रयोग झाल्यास 50 ते 65 टक्के यश मिळत़े यात मूळ प्रजात कायम राहून संकर झालेल्या कालवडी किंवा पारडूपासून दुग्धोत्पादन शक्य झाल्याचा अनुभव पशुपालकांना असल्याने दिवसेंदिवस या प्रक्रियेत वाढ होत आह़े रेतन केंद्रात संगोपन केलेला सांड, खोंड,किंवा  रेडा यांचे विर्य संकलित करून ते माजावर आलेल्या गायी किंवा म्हशीला देऊन तिला प्रजननक्षम बनवण्याची प्रक्रिया म्हणजे कृत्रित रेतन आह़े यासाठी जरसी, गावठी, खिल्लारी, गीर, डांग, काठेवाडी जातीचे खोंड किंवा सुरती, मु:हा प्रजातीचा रेडा यांचे शुक्रजंतू काढून ते कांडय़ांमध्ये भरून नायट्रोजनमध्ये ठेवले जात़े गोठण ¨बंदू खाली साठवलेले हे शुक्रजंतू टिकाव धरत असल्याने त्यापासून रेतन निर्मिती शक्य होत़े गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात याचपद्धतीद्वारे गायी म्हशींची प्रजनन क्षमता वाढवण्यात आल्याने गुरांची संख्या वाढली आह़े कृत्रिम रेतनासाठी सर्वाधिक गरजेचा असलेल्या लिक्विड नायट्रोजनची वारंवार खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाला निधी उपलब्ध करून दिला असून तापी खिल्लार व गीर या पारंपरिक खोंडाचे वीर्य अकोला येथील राज्य पशुधन विकास महामंडळ यांनी उपलब्ध करून दिले आह़े 2015-16 या वर्षात पशुसंवर्धन विभागाने 6 हजार 876 गायी व 3 हजार 976 म्हशींना कृत्रित रेतन केले होत़े एकूण 10 हजार 277 जनावरांना दिलेल्या या रेतनातून 1 हजार 169 नर, 1 हजार 94 गायीचे वासरू, 741 नर तर 712 मादी म्हशींची निर्मिती झाली होती़ एकूण 3 हजार 726 पशुंना मिळालेल्या जीवदानामुळे पशुपालकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ 2016-17 या वर्षात रेतनात लक्षणीय वाढ झाली़ एकूण 13 हजार 279 जनावरांचे रेतन करण्यात आल़े यात 1 हजार 170 नर तर 746 गाय वासरूंची निर्मिती झाली़ तसेच 771 नर आणि 581 मादी म्हशीं जन्मास आल्या़ एकूण 3 हजार 480 गुरांची निर्मिती झाल्याने संख्येत वाढ होऊ शकली़ मे 2018र्पयत जिल्ह्यात 1900 गायी आणि म्हशींचे कृत्रिम रेतन करण्यात आले आह़े 2015-16 या वर्षात 1 हजार 315 पशुंची निर्मिती नंदुरबार तालुक्यात झाली होती़ 2016-17 या वर्षातही नंदुरबार तालुक्यात 1 हजार 288 रेतनातून पशुंचा जन्म झाला होता़ 4सातपुडय़ात तसेच जिल्ह्याच्या कानाकोप:यात पूर्वापारपासून गावठी बैलांचे योगदान शेतीक्षेत्रात मोलाचे आह़े उष्ण वातावरणातही टिकून राहून शेतक:याला साथ देणा:या या बैलांची संख्या गेल्या काही वर्षात कमी झाली होती़  बैलांची अवैध विक्री आणि कत्तल यामुळे कमी झाल्याने त्यांच्यावंशात वाढीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आह़े 4शासनाच्या दुधाळ गायी म्हशीं धोरणानुसार शेतचारा उपलब्ध असल्यास गावठीचा वंश वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आह़े तर चारा वाढीव पद्धतीने उपलब्ध असलेल्या क्षेत्रात जर्सी गायींचा वंश वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आह़े