रविवारी ही लिलाव प्रक्रिया करण्यात आली. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी विजय पाटील यांनी शेतीचे अटी-शर्ती नियम सर्व समजावून सांगितले. दोन वर्षासाठी असलेल्या या प्रक्रियेंतर्गत इच्छुकांनी ५० टक्के रक्कम आता ५० टक्के एक वर्षानंतर भरावी असे सांगितले.
प्रारंभी बागायत क्षेत्राच्या लिलावाला सुरुवात झाली. सरकारी किंमत ४६ हजार असून त्यात रवींद्र लक्ष्मण पाटील यांनी २ लक्ष ९१ हजार रूपयांची बोली लावून जमीन भाडे कराराने घेतली. व दुसऱ्या शेतीच्या क्षेत्राच्या लिलावास चार लोकांनी बोली लावली. दयानंद मंगलसिंग चव्हाण यांनी १ लक्ष २ हजार रूपये कराराने ही शेती घेतली. डेली बाजार पट्टा शाकीर मुशीर तेली यांनी वीस हजार रुपयाला भाडेतत्त्वावर घेतला.
यावेळी उपसरपंच रंजंकर राजपूत, ग्रामपंचायत सदस्य इंदिराबाई चव्हाण, मंगेश पाटील, मंगलसिंग चव्हाण, सीताराम ठाकरे, तुलसीदास पाटील, माजी समाजकल्याण सभापती नरहर ठाकरे व शेतीचे लिलाव घेणारे शेतकरी उपस्थित होते.