शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

नंदुरबार जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना उपाययोजनांचा बुस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जानेवारी ते मार्च या काळात जिल्ह्यात 117 गावे टंचाईच्या छायेत आहेत़ या गावांना विविध उपाययोजना व्हाव्यात म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांनी निधी देऊन टंचाई दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आह़े जिल्ह्यात गेल्या काही वर्षात टंचाईयुक्त गावांची यादी वाढत आह़े साधारण जानेवारीपासून निर्माण होणारी पाणीटंचाई ही ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जानेवारी ते मार्च या काळात जिल्ह्यात 117 गावे टंचाईच्या छायेत आहेत़ या गावांना विविध उपाययोजना व्हाव्यात म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांनी निधी देऊन टंचाई दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आह़े जिल्ह्यात गेल्या काही वर्षात टंचाईयुक्त गावांची यादी वाढत आह़े साधारण जानेवारीपासून निर्माण होणारी पाणीटंचाई ही जुलैर्पयत टिकून रहात असल्याने चिंता वाढत आह़े सरासरीच्या 80 ते 90 टक्के पजर्न्यमान होऊनही भूजल पातळी एक मीटरने खालावल्याचे चित्र तीन वर्षात दिसून आले आह़े यामुळे टंचाईग्रस्त गावांची यादी वाढत आह़े यंदा ऑक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यातील काही गावांना पाणीटंचाई भेडसावत होती़ या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने विहिर अधिग्रहण, विंधनविहिरी, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांना मंजूरी दिली आह़े ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत़ जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून सातुर्के व काकर्दे ता़ नंदुरबार आणि असलोद ता़ शहादा येथे तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनांना मंजूरी देण्यात आली आह़े यासोबत 77 टंचाईग्रस्त गावांमध्ये 13 विंधनविहिरी, 4 खाजगी विहिरींचे अधिग्रहण, दुस:या टप्प्यात 37 तर शेवटच्या तिस:या टप्प्यात 27 विंधनविहिरी तयार करण्यात येणार आहेत़ तृतीय सत्रात धडगाव तालुक्यात दोन नव्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार असून नवापूर तालुक्यातील नानगीपाडा व पायरीविहिर या गावांना तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत़ जिल्हा परिषद आदिवासी उपयोजना क्षेत्र विकास योजनेंतर्गत ही कामे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आह़े जिल्हा परिषदेकडून टंचाईग्रस्त गावांकडून आलेल्या प्रस्तावांनंतर निधी देऊन तो पाणीपुरवठा योजनेसाठी खर्च करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े यातून यंदा जिल्ह्यातील एकाही गावात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी युद्धपातळीवर कामकाज करण्यात येत आह़े टंचाई निवारणासाठी तालुकस्तरीय अधिका:यांनाही टंचाईग्रस्त गावांची माहिती पाठवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत़ यानुसार पाणीटंचाई असलेल्या गावांचे सव्रेक्षण करून तात्पुरत्या किंवा कायम योजनांसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना ग्रामस्तरावर केल्या जात असल्याची माहिती देण्यात आली आह़े जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून यंदा 77 गावे टंचाईग्रस्त असल्याचे जाहिर करण्यात आले होत़े यानुसार 88 उपाययोजनांना मंजूरी देण्यात येऊन त्यासाठी निधीलाही मंजूरी देण्यात आली आह़े या निधीतून ही टंचाई निवारणाची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती देण्यात आली आह़ेएकीकडे ही कामे प्रगतीपथावर असताना दुसरीकडे धडगाव तालुक्यात गौ:याचा बोदलापाडा व कुंडलचा गुगलमालपाडा येथे टँकर सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आह़े एप्रिल पासून सुरू होणा:या टंचाईच्या तिस:या टप्प्यात या दोन्ही गावांमध्ये टँकर सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात यंदा केवळ 9 पाडे हे टंचाईच्या विळख्यात असून तेथेही उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती आह़े