शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

बोगस शिक्षक भरती प्रकरणी संस्थाचालकांच्या चौकशीमुळे खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेत बोगस शिक्षक भरतीप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी धुळे, शहादा व जळगाव जिल्ह्यातील संबधित शिक्षण संस्था चालकांना पाचारण केले आहे. गुरुवारी एका संस्थाचालकाची चौकशी झाल्याचे समजते. यामुळे या प्रकरणातील दलालांमध्ये खळबळ उडाली आहे.अपंग युनिटअंतर्गत बोगस शिक्षक भरतीप्रकरणी पोलिसांनी 31 शिक्षक आणि दोन अधिका:यांसह चार कर्मचारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेत बोगस शिक्षक भरतीप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी धुळे, शहादा व जळगाव जिल्ह्यातील संबधित शिक्षण संस्था चालकांना पाचारण केले आहे. गुरुवारी एका संस्थाचालकाची चौकशी झाल्याचे समजते. यामुळे या प्रकरणातील दलालांमध्ये खळबळ उडाली आहे.अपंग युनिटअंतर्गत बोगस शिक्षक भरतीप्रकरणी पोलिसांनी 31 शिक्षक आणि दोन अधिका:यांसह चार कर्मचारी अशा 37 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अपंग युनिट दाखविण्यात आलेल्या शाळांमध्ये चौकशी पुर्ण केली आहे. आता संबधित शिक्षणसंस्था चालकांची चौकशी सुरू केली आहे. तीन संस्थाचालकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्यात धुळे, शहादा व जळगाव जिल्ह्यातील एका शिक्षण संस्था चालकाचा समावेश आहे. या शिक्षणसंस्था चालकाकडून चौकशीतून काय बाहेर पडते यावर चौकशीची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे. यामुळे बोगस शिक्षकांकडून पैसे घेवून दलाली करणा:या संबधितांमध्ये खळबळ उडाली आहे. आता पोलिसांचा त्यांच्यावर डोळा आहे. चौकशीअंती सर्व रोख संबधीत दलालांवर आहे. त्यामुळे त्यांची अटक अटळ मानली जात आहे. परिणामी संबधितांमध्ये खळबळ उडाली आहे. तपास फौजदार संदीप पाटील करीत आहे.