शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक घोटाळ्यात 12 शाळांनी दाखविले बोगस अपंग युनिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:08 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 31 व संशयीत 40 अशा 71 जणांना ज्या शाळा व संस्थांनी आपल्या संस्थेत नेमणुकीस दाखविले होते त्या संस्था व शाळांचीही चौकशी होणार आहे. अशा शाळा, संस्थाचालकांनी अशा उमेदवारांना आपल्याकडे नोकरीस असल्याचे दाखविण्यासाठी कसा व कोणता आर्थिक व्यवहार केला याची चौकशी ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 31 व संशयीत 40 अशा 71 जणांना ज्या शाळा व संस्थांनी आपल्या संस्थेत नेमणुकीस दाखविले होते त्या संस्था व शाळांचीही चौकशी होणार आहे. अशा शाळा, संस्थाचालकांनी अशा उमेदवारांना आपल्याकडे नोकरीस असल्याचे दाखविण्यासाठी कसा व कोणता आर्थिक व्यवहार केला याची चौकशी होऊन त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यासाठी आता पोलिसांनीच व्यापक तपास मोहिम सुरू करणे आवश्यक आहे.  अपंग युनिटअंतर्गत शिक्षक भरतीचा घोटाळ्याची व्याप्ती मारुतीच्या शेपटीप्रमाणे दिवसेंदिवस वाढत चालली आहे. केंद्र शासनाच्या या अपंग एकात्मिक योजनेअंतर्गत 2008 मध्ये अपंग युनिट माध्यमिक शाळांमध्ये चालविण्यात आले होते. ते युनिट 2010-11 मध्ये बंद करण्यात आले. त्यातील साडेपाचशेपेक्षा अधीक शिक्षकांना राज्यभरात सामावून घेण्यात आलेही. परंतु त्यानंतरही समायोजन करण्यासाठी बोगस शिक्षक संस्था, शाळांमध्ये दाखविण्यात आले. त्यातील एक मोठी संस्था धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील आहे. या संस्थेचे शिंदखेडा, साक्री, शिरपूर तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्यात देखील काही शाखा आहेत. याशिवाय नंदुरबार जिल्ह्यातीलच एका संस्था चालकाचे नाव देखील पुढे येत आहे. या संस्था चालकाच्याही जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाखा आहेत. संबधीताने एका राजकीय पक्षाचे मोठे पद देखील मिळविले आहे. या दोन संस्था चालकांनीच हे रॅकेट तयार केले होते. त्यांनीच आपल्या संस्थांमधील विविध शाखांमध्ये 71 जणांना अपंग युनिटमधील शिक्षक असल्याचे दाखविले आहे. अपंग विद्यार्थी नसतांना तेथे युनिट कसे दाखविण्यात आले हा प्रश्न आहे.संबधीत शाळांची चौकशी..71 जणांच्या कागदपत्रांमध्ये ज्या शाळांमध्ये ते यापूर्वी अपंग युनिटअंतर्गत असल्याचे दाखविण्यात आले आहे त्या शाळांची चौकशी होण्याची शक्यता आहे. अशा शाळांमधील तत्कालीन मुख्याध्यापकांनी युनिट कसे दाखविले, कुठल्या आधारावर ते निर्माण करण्यात आले. विद्यार्थी असतील तर कुठले होते. त्यांची यादी त्या शाळांमध्ये आहे का? असे एक ना अनेक प्रश्न या चौकशीत उपस्थित होणार आहे.संस्थाचालक परागंदाया रॅकेटमधील मुख्य सूत्रधार दोन संस्थाचालक व त्यांना मदत करणारे तीन असे पाचजण सध्या परागंदा आहे. पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या कारवाईपासून बचावासाठी ते वरिष्ठ पातळीवर हरत:हेने प्रय} करीत आहेत. ज्यांनी पैसे दिलेले आहेत ते युवक आणि त्यांचा परिवार देखील या संस्थाचालकांच्या मागावर आहेत. तपासाची व्यापकता वाढवावीया प्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला आहे. परंतु पोलिसांकडून अगदीच थंड तपास सुरू आहे. प्रकरणाची व्याप्ती पहाता पथके स्थापन करून मुळ सूत्रधारांर्पयत पोहचण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.