तळोदा येथील आदित्य जीमच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त तळोदा येथे फिटनेस मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजप ओबीसी सेलचे विश्वनाथ कलाल, भाजपचे तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, अनुसूचित जाती आघाडीचे डॉ.स्वप्नील बैसाणे, पोलीस उपनिरीक्षक अभय मोरे आदी उपस्थित होते.
या वेळी डांगे म्हणाले की, तळोदासारख्या शहरातूनही शरीरसौष्ठवपटू घडले पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशासाठी सुवर्णपदक पटकावले. त्यासाठी मला अनेक मान्यवरांचे पाठबळ मिळाले. त्यामुळे सामान्य कुटुंबातील तरुणांना योग्य मदत व मार्गदर्शन मिळाले तर ते देखील या क्षेत्रात नाव कमवू शकतात. त्यामुळे या क्षेत्राकडे गांभीर्याने बघण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विश्वनाथ कलाल यांनीही उपस्थितांना व्यायामाचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी लकी ड्रॉचे विजेते घोषित करण्यात आले. सूत्रसंचालन अविनाश माळी यांनी तर आभार आदित्य मालपुरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी आदित्य जिमचे शुभम कर्णकार, विवेक महाले, विकास जाधव, गणेश सोलंकी, मयूर महाले, पुष्पेंद्र मराठे, नीलेश जावरे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
शरीरसौष्ठवपटू घडविण्यासाठी तळोदा दत्तक
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तळोदासारख्या आदिवासी बहुल भागातील शहरातून शरीरसौष्ठवपटू घडावेत यासाठी युवकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तळोदा शहर दत्तक घेत असल्याची घोषणा शरीरसौष्ठवपटू किशोर डांगे यांनी याप्रसंगी केली. व्यायामासंदर्भात व शरीरसौष्ठवबाबत कोणत्याही मार्गदर्शनासाठी युवकांना कधीही मदत करण्यास तयार असून यामुळे युवकांसाठी विनामूल्य वेबिनार घेणार येणार असल्याची माहिती किशोर डांगे यांनी दिली.