शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

पत्नी-पत्नीचे मृतदेह आढळले तापीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 11:21 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :  पत्नीसह निघाला होता सासरीवाडीला, मात्र पोहचला प्रकाशाला आणि संपवली जीवनयात्रा... दोन दिवसांपासून शोध ...

  लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा :  पत्नीसह निघाला होता सासरीवाडीला, मात्र पोहचला प्रकाशाला आणि संपवली जीवनयात्रा... दोन दिवसांपासून शोध सुरू असलेल्या दाम्पत्यांचे मृतदेह प्रकाशा बॅरेजमध्ये आढळले. त्यांची दुचाकी मंगळवारी दुपारी तेथेच आढळून आली होती. एकलुता एक मुलाने केलेल्या आत्महत्येमुळे जुनमोहिदा येथील त्याच्या आईवडिलांनी एकच हंबरडा फोडला.  पावबा लक्ष्मण ठाकरे (२४) व त्याची पत्नी  सुश्याबाई पावबा ठाकरे (२०) रा.जुनमोहिदा, ता.नंदुरबार असे मयतांची नावे आहेत. पावबा हा आपल्या मोटरसायकलने (क्रमांक एम.एच.३९ए. एफ.०५५०) २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११वाजता आपल्या सारवाडी तलावडी , ता.शहादा येथे जाण्यासाठी निघाला होता. प्रकाशा मार्गे दोघे गावी जाण्यासाठी आले. परंतु सासरवाडीला न पोहचता दोघे बॅरेजच्या पाण्यात आढळले.मंगळवारी त्यांची मोटरसायकल बॅरेजवर आढळली होती. मोटारसायकल मालकाचा तपास केला असता ती जुनमोहिदा येथील पावबा ठाकरे यांची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांना बोलविण्यात आले असता त्यांनी दोघे पती-पत्नी तलावडी येथे जाण्यासाठी निघाल्याचे सांगितले. त्यांचा आसपास शोध घेतला, पाण्यातही अंदाज घेतला, मात्र आढळून आले नव्हते. त्यामुळे नातेवाईक मंगळवारी सायंकाळी गावी परतले. दुसरीकडे प्रकाशा दूरक्षेत्राकडून देखील तपास सुरू होता. सकाळी मात्र त्या दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आले. पोलिसांनी लागलीच लक्ष्मण ठाकरे यांना कळविले. त्यांनी पोलिस पाटील चेतन पाटील,ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील आणि गावातील नातेवाईक व इतरांसह प्रकाशा गाठले. मृतदेह पहाताच लक्ष्मण पाटील यांनी हंबरडा फोडला. मुलगा व सून असे अचानक सोडून जाऊच शकत नाही,  असे ते सांगत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार सोमवार, २नोव्हेंबर रोजी सकाळी ११वाजता ते आनंदाने तलावडी येथे जाण्यासाठी निघाले होते. घरात काहीही भांडणतंटा नव्हता. परिवार गुण्यागोविंदाने राहत होता. असे असतांना त्यांनी आत्महत्या करणे शक्यच नाही असेही नातेवाईकांकडून सांगितले जात होते.  या घटनेमुळे जूनमोहिदा गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याला लहान बहिणी असून त्यांची लग्न झालेली नाहीत. दोघांवर प्रकाशा येथील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात आले. पती-पत्नीचे मृतदेह शेजारीच ठेवण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी शोकाकूल वातावरण होते.  यावेळी जूनमोहिदा, तलावडी येथील तसेच इतर ठिकाणचे नातेवाईक उपस्थित होते.  पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास माळी, सुनिल पाडवी, अरुण सैंदाणे, पंकज जिरेमाळी आदी करित आहेत.

   शवविच्छेदन उशीराने... प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन करणारे एमबीबीएस डॉक्टर नसल्याने वाडी पुनर्वसन येथून डॉक्टरांना बोलवावे लागले. दुपारी १२ वाजता डॅाक्टर आले, परंतु सहकार्य करण्यासाठी  कर्मचारी नव्हता. तो देखील दुपारी अडीच वाजता पोहोचला. शवविच्छेदन प्रक्रिया करण्यासाठी मग सायंकाळचे साडेचार पाच वाजले होते. त्यामुळे लोकाचा संताप अनावर झाला होता.

  डॅाक्टरांची नेमणूक व्हावीप्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर ची अत्यावश्यक गरज आहे. या ठिकाणी वेळोवेळी शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध होत नाही तेव्हा बाहेरगावी डॉक्टर बोलवावा लागतो. तसेच शवविच्छेदन करण्यासाठी  स्वीपर ची ही अतिशय गरजेचे आहे.तेव्हा उड कडे ही तक्रार कली आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन ताबडतोब येथील पदे भरले पाहिजेत. अशी मागणी केली आहे.-रामचंद्र पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष.