शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमित वनजमिनीच्या वादातून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील बोरद येथे अतिक्रमीत वनजमिनीच्या वादातून शालकाने इतर नातेवाईकांसह मेहुण्याला बेदम मारहाण करून जीवे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील बोरद येथे अतिक्रमीत वनजमिनीच्या वादातून शालकाने इतर नातेवाईकांसह मेहुण्याला बेदम मारहाण करून जीवे ठार मारल्याची घटना मंगळवारी दुपारी 12 वाजता घडली.पोलीस सूत्रानुसार, मयत रुपसिंग रतिलाल नाईक (62) मुळ रा.तुळाजे ह.मु. बोरद, ता.तळोदा याची  तुळाजे येथील अतिक्रमित वनजमीन शालक देवा लालसिंग मोरे, करण  देवा मोरे हे करीत असून, या अतिक्रमित वनजमिनीच्या कारणावरून शालक व मेहुणा  यांच्यात वाद झाला. मयत रूपसिंग नाईक  हा त्याचा भाचा कांतीलाल रमेश भिल याच्याकडे बोरद येथे गेल्या सात ते आठ वर्षापासून राहात आहे.11 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास तुळाजे येथून संबंधीत देवा लालसिंग मोरे त्याची पत्नी वशीबाई मोरे, करण देवा मोरे, मयताची पत्नी आसुबाई, तिची बहिण उषाबाई दिलीप ठाकरे, मुलगी जमनाबाई व तीचा पती पिंटय़ा लालसिंग मोरे यासह इतर ओळखीचे तीन ते चार स्त्री-पुरूष देवा मोरे यांच्या गाडीतून लाठय़ा-काठय़ा व लोखंडी सळ्या घेऊन बोरद येथे कांतीलाल रमेश भिल यांच्या घरी आले. त्याचा मामा रूपसिंग रतिलाल नाईक (62) हा बाहेर खाटेवर बसला होता. या सर्वाना बघन तो घरात पळाला. ते सर्व जण त्याच्या मागोमाग घरात पळाले. त्यांनी लोखंडी सळ्या, लाठय़ा काठय़ांनी रूपसिंग नाईक यास बेदम  मारहाण केली. यानंतर त्यास घरातून बाजारात नेत तेथेही बेदम मारहाण केली. या वेळी बाजारात  गर्दी जमली.  कातीलाल भिल  त्याची पत्नी व इतरांनी सोडविण्याचा प्रय} केला परंतु मारणारे अधिक असल्याने ते कोणाचेच ऐकत नव्हते.जखमी अवस्थेत फिर्यादी मयताचा भाचा कांतीलाल रमेश भिल याने मयतास उपचारासाठी तेथील दवाखान्यात दाखल केले. मात्र तपासणी नंतर रूपसिंग नाईक मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कांतीलाल भिल यांच्या फिर्यादीवरून संशीयांविरूद्ध उशिरार्पयत गुन्हा दाखल करण्यात येत होता. तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.