लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील जुना प्रकाशा रोडवरील महावितरण वीज कंपनीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महावितरणचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील 70 दात्यांनी रक्तदान केले. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी महावितरणच्या राज्यभरातील कार्यालयांमध्ये एकाच दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार 11 ऑक्टोबर रोजी शहादा येथील विभागीय कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान रक्तदान शिबिर घेण्यात आले. महावितरणचे कर्मचारी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी शिबिरात सहभाग घेतला. शिबिरात शहादा, तळोदा, धडगाव व अक्कलकुवा उपविभागातील सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य अशा 70 दात्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी कार्यकारी अभियंता किसन पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर.एन. गजभिये, अभियंता शशिकांत पटेल, अभियंता सचिन काळे, अभियंता अविनाश पाटील, कनिष्ठ अभियंता सुजित पाटील, सचिन पावरा, विनोद भदाणे, ईश्वर तायडे, तुषार ठाकूर, एम.एम. ठाकरे, वाय.पी. ठाकरे, एस.एस. वळवी, पवन तेले, कोमलसिंग ठाकरे, राकेश पवार, महेश ठोभरे व कर्मचा:यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन सचिन सोनवणे यांनी तर आभार विजय भलकार यांनी मानले.
महावितरणच्या शिबिरात 70 दात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:47 IST