शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
2
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”
3
दिल्ली उद्ध्वस्त करण्याची योजना, रावळपिंडीत ट्रेनिंग घेतलं! आयएसआयचे दोन हेर पोलिसांच्या ताब्यात
4
'दाल मे कुछ काला है'; शरद पवार गटाची रूपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका
5
मोठी बातमी! अथिया शेट्टीने बॉलिवूडला ठोकला रामराम, आई झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय! चाहत्यांना धक्का
6
अनिल गोटेंनी टाळे ठोकलेल्या खोलीत पैशांचे घबाड सापडले; कुलूप तोडून पोलीस आत गेले... 
7
जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
8
"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
9
दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं
10
माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती
11
कान्समध्ये पहिल्यांदाच झळकली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे, ग्लॅमरस लूकने गाजवलं रेड कार्पेट
12
Supriya Sule : "माणसं सैतानासारखी एवढी निर्दयी कशी वागू शकतात?"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
13
अमेरिकेतून आले 'निराशेचे' संकेत! सेन्सेक्स-निफ्टी धडाम, 'या' १० शेअर्सचं सर्वाधिक नुकसान
14
धुळ्यात 'रात्रीस खेळ चाले...' : विधिमंडळाच्या आमदारांच्या समितीतील सदस्यांसाठी ठेवले साडेपाच कोटी; रेस्ट हाऊसमध्ये सापडले घबाड!
15
दोघांच्या सहमतीनेच शरीरसंबंध घडले; बलात्कारप्रकरणातून शास्त्रज्ञाची सुटका
16
राष्ट्रवादीची राजेंद्र हगवणेंवर कारवाई; पक्षातून बडतर्फ केलं, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजित पवारांनी कारवाईचे दिले आदेश
17
रितेशच्या 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार टीव्ही अभिनेता, 'सुख म्हणजे...' मालिकेत केलंय काम
18
Jyoti Malhotra : ४ वेळा मुंबईला गेलेली ज्योती मल्होत्रा; गर्दीच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ कोणाला पाठवले?
19
अमेरिकेत इस्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; ज्यूइश म्युझिअमबाहेर गोळीबार
20
धक्कादायक आकडेवारी! जगातली निम्मी संपत्ती फक्त १% लोकांकडे, भारताचा नंबर कितवा?

मद्यपी मुलाचा पित्याकडून खून : वाघर्डेची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:31 IST

मृतदेहाचा परस्पर दफनविधी : आठवडाभरानंतर उघड

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 17 : शहादा तालुक्यातील वाघार्डे येथील एकाने आपल्याच मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवेठार मारून त्याचे प्रेत घरामागील शौचालयाच्या खडय़ात पुरून ठेवल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेचे वृत्त   कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून आरोपीस तत्काळ  ताब्यात घेतले. मयत हा धान्य विकून दारूपित असल्याच्या रागातून ही घटना घडल्याचा प्राथमिक             अंदाज व्यक्त करण्यात येत  आहे.पोलीस सूत्रानुसार असे की, मंदाणेपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघर्डे गावात द्वारका पौलद चव्हाण हा प}ी व मुलांसह रहात होता. त्याच्या तीन मुलांपैकी एक मुलगा मगन हा कुटुंबासह दुधखेडा येथे वास्तव्याला आहे तर तिसरा लहान मुलगा हा प}ीसह  होळी निमित्ताने चांदसैली येथे गेलेला होता व मयत छगन याची प}ीही नवानगर येथे माहेरी होळी सणासाठी गेली होती. त्यामुळे घरात द्वारका, प}ी विमलबाई, मुलगा छगन व त्याचा मुलगा जयेश असे चार जण सध्या रहात होते. 9 मार्च रोजी  रात्रीच्या सुमारास सर्व जण जेवायला बसले असताना छगन हा दारू पिवून आलेला होता. त्यामुळे द्वारका चव्हाण यांना छगन हा दारू प्यालेला दिसल्याने त्यास वडिलांनी तू धान्य विकून दारू पितोस असे करू नको  असे सांगितले. छगनला याचा राग आला. या कारणावरून पिता-पूत्रामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जावून दोघांमध्ये झटापटी झाल्या. त्यातच छगनने विळा घेवून वडिलांना मारायला धावला. तेवढय़ात आईने छगनच्या हातातील विळा हिसकावण्याचा प्रय} केला. परंतु तेवढय़ात त्याने तो विळा वडिलांवर मारून फेकला. मात्र तो विळा वडिलांनी चुकवला अशातच वडील द्वारका यानेही लाकडी दांडक्याने छगनच्या पोटावर, छातीवर दांडक्याने जबर मारहाण केली. गंभीर जखमी झालेला छगन जागेवरच कोसळला. पिता-पूत्रांमध्ये नेहमी वादावादी, मारामारी होत असल्याने विमलबाई ह्या घरा बाहेर झोपून गेल्या.छगनचा जागीच मृत्यूवडील द्वारका याने लाकडी दांडक्याने छगनच्या पोटावर, छातीवर व डोक्यावर केलेल्या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पाहून द्वारका चव्हाण याने त्याची कोणालाही कुणकुण लागू न देता विल्हेवाट लावण्याचा प्रय} केला. सकाळी प}ीने छगनच्या बाबतीत विचारपूस केल्यावर त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. प}ीनेही याबाबत गांभीर्य न घेता त्या  कामाला निघून गेल्या. घरी कुणीही नाही याची संधी साधून द्वार याने घरामागील शौचालयाच्या सोश खडय़ात छगनचा मृतदेह पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रय} केला. संध्याकाळी प}ी घरी परतल्यावर शौचालयाचे बांधकाम केल्याचे आढळून आले.याबाबत प}ी विमलबाईने विचारणा केली असता पाईप टाकल्याचे द्वारका चव्हाणने सांगून टाळाटाळ केली व छगनही कुठे कामाला गेला असावा असे विमलबाईंना वाटले. अखेर घटना उघडह्या घटनेस तब्बल आठवडा उलटला तरी ह्या घटनेचा उलगडा झाला नाही. अखेर मृतदेहाची दरुगधी यायला लागल्यानंतर मयत    छगनच्या काकांना याची कुणकुण लागली. त्यांनी लगेच विमलबाईंना घटनेची माहिती दिली. त्यानंतर विमलबाईंनी पोलीस पाटील यांना माहिती देवून शहादा पोलिसांना कळविले.परिसरात खळबळपरिसरात भुलाणे येथे लहान भावाने शुल्लक कारणावरून मोठय़ा सख्या भावाला भर दिवसा ठार केल्याची घटना अगदी ताजी असताना  वाघर्डे येथील बापाने मुलाला ठार केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ह्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला          यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर हे करीत आहेत.