शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्लास्टींग’मुळे प्रकाशा बॅरेजला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 11:55 IST

प्रकाशा : तापी नदीवर येथे नव्याने पूल बांधकामासाठी ब्लास्टींगद्वारे खड्डे खोदले जात असल्याने जवळच असलेल्या बॅरेजला धोका निर्माण झाला ...

प्रकाशा : तापी नदीवर येथे नव्याने पूल बांधकामासाठी ब्लास्टींगद्वारे खड्डे खोदले जात असल्याने जवळच असलेल्या बॅरेजला धोका निर्माण झाला आहे. तसेच कोळदा ते सेंधवा दरम्यान सुरू असलेले रस्त्याच्या रुंदीकरण कामांतर्गत प्रकाशाजवळ जोडणारे रस्ते अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहेत. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले आहे.याबाबत वृत्त असे की, कोळदा ते सेंधवा दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रकाशा गावाजवळील तापी नदीवरील जुन्या पुलाजवळ नवीन पुलाचे बांधकामही करण्यात येत आहे. या पुलाच्या कामासाठी तापी नदीपात्रात ब्लास्टींग करून खड्डे खोदण्यात येत आहेत. या ब्लास्टींगमुळे जवळच असलेल्या बॅरेजला धोका निर्माण झाल्याचे ग्रामस्थ व शेतक:यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच हे काम रात्री 11 ते मध्यरात्रीर्पयत करण्यात येते. ब्लास्टींगमुळे प्रकाशा गावातील घरांचे दारे-खिडक्यांनाही हादरा बसतो. ब्लास्टींगमुळे बॅरेजला धोका निर्माण झाला तर त्याला कोण जबाबदार राहील, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. प्रकाशा बॅरेज प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.जोडरस्ते ठरताहेत अपघातीप्रकाशा गावाजवळ रस्ता रुंदीकरणाचे काम झाले आहे. मात्र काँक्रिटीरणाचे काम जेथे जेथे झाले आहे त्याठिकाणी जोडणारे रस्ते योग्य नसल्याने अपघात होत आहेत. प्रकाशा-वैजाली चौफुली, बसथांबा चौफुली, मुरारी पेपर मीलजवळ, त:हावद रस्ता, नांदर्डे गावाला जोडणारा रस्ता आदी ठिकाणी जोडणारे रस्ते खाली आहेत. या जोडरस्त्यांना केलेली भर योग्य न झाल्याने रोजच वाहने स्लीप होणे, अवजड वाहने मागे येणे आदींमुळे अपघात होत आहे.रस्त्याचे काम अपूर्णप्रकाशा गावालगत काही ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण आहे. प्रकाशा-तळोदा रस्त्यावर भुवनेश्वरी पेट्रोल पंपाजवळ, प्रकाशा-शहादा रस्तावर रामनगरजवळ, धुरखेडा रस्त्याजवळ काम अपूर्ण आहे. काम अपूर्ण असल्याने याठिकाणी कच्च्या रस्त्यामुळे उडणा:या धुळीने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याबाबत याठिकाणी सूचना फलक नसल्याने अपघात होत आहेत.या सर्व समस्यांना कंटाळून प्रकाशा येथील ग्रामस्थ व शेतक:यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा 29 ऑक्टोबरपासून रस्ता रोको आंदोलन करण्याचा  इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर हरी पाटील, वसंत चौधरी, राजाराम चौधरी, लिंबा चौधरी, शरद पाटील, पुरुषोत्तम पाटील, जगदीश महाजन, नारायण चौधरी, अशोक चौधरी, अनिल भोई, आदींसह        शेकडो ग्रामस्थ व शेतक:यांच्या सह्या आहेत.