शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

नंदुरबारात भाजपाची मोदी लाट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 12:49 IST

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ.हीना गावीत व काँग्रेसचे आमदार अॅड.के.सी. पाडवी या दोघांमध्ये मोठी चुरस होती. मतदानाची ...

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ.हीना गावीत व काँग्रेसचे आमदार अॅड.के.सी. पाडवी या दोघांमध्ये मोठी चुरस होती. मतदानाची टक्केवारीही या वेळी वाढली होती. या मतदारसंघात एकूण 18 लाख 70 हजार मतदार होते. त्यापैकी 12 लाख 77 हजार मतदारांनी मतदान केले होते. गुरुवारी सकाळी आठ वाजेपासून येथील वखार महामंडळाच्या गोदामात चोख सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या तीन फे:यात काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र भाजपने मुसंडी घेत शेवटर्पयत लीड कायम राखला. मतमोजणीअखेर भाजपच्या उमेदवार डॉ.हीना गावीत यांना 6,39,136 एवढे मते तर काँग्रेसचे उमेदवार अॅड.के.सी. पाडवी यांना 5,43,507 एवढी मते मिळाली. 95,629 मतांनी डॉ.हीना गावीत यांचा विजय जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांना मिळालेली मते अशी : वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार सुशिल अंतुर्लीकर यांना 25,702 मते मिळाली. रेखा देसाई यांना 11,466, क्रिष्णा ठेगा गावीत यांना 4,438, संदीप वळवी यांना 2,196, अजय गावीत यांना 4,497, अजरूनसिंग वसावे यांना 2,936, अशोक पाडवी यांना 4,930, आनंदा कोळी 7,185, डॉ.सुहास नटावदकर यांना 13,820 मते मिळाली.सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. टपाली मतमोजणीसाठी आठ तर ईटीबीपीएससाठी दोन टेबल लावण्यात आले होते. अवघ्या अर्धा तासात ही मतमोजणी झाल्यानंतर लागलीच मतदान यंत्रातील मतमोजणीला सुरुवात झाली. पहिली फेरी अर्धा तासात झाली. परंतु अधिकृत घोषणा एक तासांनी जाहीर करण्यात आली. नंदुरबार व साक्री विधानसभेच्या 27 तर शहादा, नवापूर, अक्कलकुवा 25 व शिरपूर विधानसभा मतदारसंघाच्या 24 फे:यांमध्ये मतमोजणी पुर्ण करण्यात आली. 18 व्या फेरीनंतर कल दिसून आल्याने भाजपने विजयाचा जल्लोष सुरू केला होता.