शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
4
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
5
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
6
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
7
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
8
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
9
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
10
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
11
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
12
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
13
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
14
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
15
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
16
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
17
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
18
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
19
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
20
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...

भाजपच्या दूध आंदोलनाला राजकीय टिकेची किणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 13:06 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भाजपने गेल्या १ आॅगस्टला गायीचा दूधाला व दूध पावडरला अनुदान मिळावे ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भाजपने गेल्या १ आॅगस्टला गायीचा दूधाला व दूध पावडरला अनुदान मिळावे यासाठी आंदोलन केले खरे, पण जिल्ह्यातून शासनाकडून एक लिटर दुधाचीही खरेदी होत नसल्याने हे आंदोलन कोणासाठी असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व सत्ताधारी राजकीय पक्षातून उमटत आहे. दरम्यान, जिल्ह्यातून महाराष्टÑाऐवजी गुजरातमध्ये दूध विक्रीला जात असल्याने जिल्ह्यातील भाजप नेत्यांचे आंदोलन महाराष्टÑ सरकार विरोधात की गुजरातमधील भाजप सरकार विरोधात असा उपरोधात्मक प्रश्नही काँग्रेसकडून उपस्थित केला जात आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर विरोधी पक्ष या नात्याने भाजपने जिल्ह्यात प्रथमच रस्त्यावरचे दुधाला भाव मिळावा यासाठी आंदोलन केले. वास्तविक जिल्ह्यात गेल्या चार महिन्यापासून कोरोनामुळे निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न, खरीप हंगाम सुरू झाल्यानंतरही कर्ज माफी रखडल्याने शेतकऱ्यांचा नवीन कर्जाचा प्रश्न, युरिया टंचाईचा प्रश्न, मका, कापूस खरेदीतील अडचणी आदी विविध समस्यांनी नागरिक त्रस्त असतांना दूधाला भाव मिळावा यासाठी भाजपने आंदोलन केले. जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा या ठिकाणी हे आंदोलन झाले. या आंदोलनानंतर मात्र जनमानसातून वेगळा सूर व्यक्त होत आहे. भाजपचा दूधाचा प्रश्न राज्यस्तरावरचा असला तरी जिल्ह्यात सर्व शासकीय डेअºयाच दहा वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे दुधाची कुठलीही शासकीय खरेदी नाही. असे असतांना या आंदोलनाचा जिल्ह्यातील शेतकºयांना फायदा काय? असा प्रश्न दूध उत्पादक शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.नंदुरबार जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी शासनाकडून ठोस असा कुठलाही कार्यक्रम गेल्या १०-१५ वर्षांपासून नाही. शासकीय दूध खरेदीतील अडचणी आणि अत्यल्प भाव पहाता दहा वर्षांपासून सर्वच शासकीय डेअºया बंद आहेत. जे शेतकरी दूध उत्पादन करतात त्यांना स्थानिक स्तरावरच प्रती लिटर ५० ते ६० रुपये भाव मिळतो. काही भागात दूध उत्पादनाची चळवळ सुरू असल्याने महिला बचत गटांमार्फत डेअरी चालवली जाते. या डेअरीतील दूध हे गुजरातमधील सुमूल डेअरीकडे पाठविले जाते. रोज सुमारे तीन हजार लिटरपेक्षाही अधीक दूध या बचत गटांमार्फत सुमूल डेअरीकडे जाते. याशिवाय इतरही काही खाजगी व्यावसायिक दूध संकलन करून गुजरातमध्ये विक्री करतात. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व दूधाची विक्री गुजरातमध्येच होते. परिणामी भाजपच्या दूध आंदोलनाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. एकीकडे टिकेचा सूर व्यक्त होत असतांना दुसरीकडे मात्र भाजपने दुधाचे आंदोलन हाती घेतलेच आहे तर दुध उत्पादक शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासंदर्भात व जिल्ह्यातील बंद पडलेल्या शासकीय दूध डेअºया नव्याने सुरू करण्यासंदर्भातही पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातून दूध गुजरातमध्ये जात असल्याने भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आंदोलन महाराष्ट्र शासनाविरोधात केले की गुजरातच्या भाजप सरकार विरोधात या बाबत लोकांमध्ये संभ्रम वाटतो. खरेतर जिल्ह्यातील दूध उत्पादकांवर खऱ्या अर्थाने गुजरातमध्ये अन्याय होत आहे. कारण येथून सर्व दूध गुजरातमध्ये जाते. तेथील डेअरीतर्फे महाराष्टÑातील शेतकऱ्यांसाठी वेगळा दर व गुजरातमधील शेतकºयांसाठी वेगळा दर दिला जातो. अर्थातच महाराष्टÑातील शेतकºयांना कमी भाव मिळतो. पशुखाद्य बाबतही असाच भेदभाव केला जातो. त्यामुळे काँग्रेसतर्फे लवकरच गुजरातमध्ये दूध विक्री करणाºया शेतकºयांची बैठक बोलावून या विषयावर आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.-दिलीप नाईक, कार्याध्यक्ष, नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी.

भाजपचे दूध आंदोलन हे केवळ नंदुरबार जिल्ह्यासाठी नव्हते. तर ते संपुर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी होते. राज्यभर पक्षाचे आंदोलन झाले. त्यामुळे त्याला पाठींबा म्हणून पक्षानेही जिल्ह्यात आंदोलन केले व ते यशस्वी झाले. मुळातच भाजपने सुरुवातीपासून जिल्ह्यातील जनतेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोना काळातील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. पालकमंत्र्यांकडे सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा केला आहे. कर्ज माफीचा प्रश्न असो की इतर प्रश्न जिल्हा भाजपने सातत्याने प्रशासनाचा निदर्शनास हे प्रश्न आणून देऊन ते सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही ते राहील.-विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष, भाजप.