शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महुफूलापासून बिस्कीटचा प्रकल्प रखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 12:27 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडय़ातील अनेक आदिवासी कुटूंबांचे अर्थकारण हे महूफुलाच्या झाडाच्या उत्पादनापासून  आहे. सातपुडय़ात ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ातील अनेक आदिवासी कुटूंबांचे अर्थकारण हे महूफुलाच्या झाडाच्या उत्पादनापासून  आहे. सातपुडय़ात या झाडांची विपुलता लक्षात घेता या फुलांवर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी शासनाच्या योजना असल्या तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याची स्थिती आहे. महुफुलांमधील जीवनसत्व लक्षात घेता त्यापासून बिस्कीट तयार करण्याचा प्रकल्प देखील असाच बारगळला आहे.       सातपुडय़ाच्या द:याखो:यात महुफूलांची झाडे विपूल प्रमाणात आहेत. या फुलांमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण देखील अधीक आहे. सातपुडय़ात जागोजागी आणि सहज उपलब्ध होणा:या या झाडांच्या फुला,फळांचा उपयोग स्थानिक आदिवासींसाठीच करून घ्यावा यासाठी आदिवासी विकास विभागाच्या अनेक योजना आहेत. काही संस्थांनी महू फुलाच्या झाडाचे अत्याधुनिक कलमे देखील उपलब्ध करून दिली आहेत. कमी कालावधीत मोठे होणारे आणि फुल,फळ देणारे हे कलम आहे. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. परंतु केवळ फुलांचे आणि टोळंबीचे उत्पादन घेवून उपयोग नाही तर त्यांच्यावर प्रक्रिया केलेले पदार्थ देखील निर्माण होणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात महूफुलांपासून बिस्कीट तयार करण्याचे स्थानिक उद्योग आहेत. या बिस्किटांना चांगली मागणी देखील आहे. कुपोषीत मुलांसाठी ती उपयोगी ठरतात. ती बाब हेरून जिल्ह्यातील बचत गटांना देखील या उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. काही बचत गटांना गडचिरोली जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी देखील पाठविण्यात आले. तेथून प्रशिक्षण घेवून ते आले देखील परंतु स्थानिक स्तरावर त्याचे युनिट सुरू करण्यासंदर्भात फारशी उत्सूकता दाखविली गेली नसल्याचेच चित्र आहे. ज्या ठिकाणी या युनिटला जागा हवी आहे किंवा तत्वत: मंजुर आहे तेथे खुद्द आदिवासी विकास विभागाच त्याला ना हरकत दाखला देत नसल्याची स्थिती आहे. 

प्रक्रिया उद्योगांची नुसतीच घोषणा.. सातपुडय़ात  महूफुल, आंबा, सिताफळ यांची झाडे मोठय़ा प्रमाणावर आहे. सिझननुसार आदिवासी कुटूंब या झाडांपासून ब:यापैकी उत्पादन मिळवत असतात. परंतु स्थानिक ठिकाणीच या झाडांच्या फळावरील प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास आदिवासी कुटूंबांचे अर्थकारण बदलणार आहे. परिणामी आरोग्य आणि आर्थिक समस्याही सुटणार आहे. परंतु वेळोवेळी राजकारणी मंडळी केवळ प्रकल्प उद्योगांची घोषणा करतात, परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याची स्थिती आहे.