तळोदा तालुक्यातील अनेक रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी शासनाच्या अर्थ संकल्पात निधीची तरतूद करण्यात आली होती. हा निधी आदिवासी विकास कार्यक्रम अंतर्गत देण्यात येणार होता. साहजिकच तालुक्यातील अनेक रस्ते व पुलांच्या कामांचा प्रस्ताव टाकण्यात आला होता. शिवाय संबंधितांकडे आमदार पाडवी यांनी पाठपुरावा सुध्दा केला होता. त्यामुळे त्यातील काही विकास कामांना निधी उपलब्ध झाला आहे. त्यानुसार सोमवारी आमदार राजेश पाडवी यांनी १६ विकास कामाचे भुमीपूजन केले . जवळपास १२ कोटींची कामे आहेत. त्यात आमलाड ते बहुरूपा, दसवड, मोरवड ते प्रतापपूर, खरवड ते मोड, बोरद ते लाखापूर, न्युबन ते बोरद, न्युबन, सिलिंगपूर, मालदा ते तुळाजा, लाखापूर ते धनपूर, सावरपाडा ते सिंलीगपूर, बंधारा ते खर्डी, राझंणी ते पाडळपूर पूल, सलसाडी ते प्रतापपूर, नवागाव ते सलसाडी या गावांना कामांची सुरूवात करण्यात आली आहे. तसेच शहादा तालुक्यातील कामांना देखील निधी मंजूर झाला असून, लवकरच येथील १३ कामाचेही भूमीपूजन करण्यात येणार आहे. या वेळी आमदार राजेश पाडवी यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोरोना सारख्या महामारीशी लढताना विकास कामांना देखील ब्रेक बसला होता. परंतु आता विकास कामांना सुरुवात झालेली आहे.
मतदार संघातील दळण वळणाची रस्ते सुलभ करण्याचे नियोजन मी केले आहे. त्यामुळे मतदार संघाचा विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपा प्रदेश सदस्य डॉ.शशीकांत वाणी, पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, तालुका अध्यक्ष बळीराम पाडवी, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश वळवी, जिल्हा परिषद सदस्य सुनिता पवार, भरत पवार, प्रा.विलास डामरे, पंचायत समिती सदस्य विजय राणा, विक्रम पाडवी, दाज्या पावरा, चंदन पवार, अनिल पवार, मालदा संरपच करूणा पावरा, लाखापूर संरपच प्रताप नाईक, श्याम राजपूत,अदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण ठाकरे, अदिवासी मोर्चा तालुका अध्यक्ष दरबारसिंग पाडवी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष चेतन गोसावी, रणजित चौधरी, स्वीय सहायक विरसिंग पाडवी, विठ्ठलराव बागले, प्रविण वळवी, गुड्डू वळवी, कुष्णा पाडवी, संबंधित ठेकेदार व कार्यकर्ते उपस्थित होते.