याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा वळवी यांनी सांगितले की, शहरी भागात महिलांच्या बाळंतपणासाठी चांगल्या सेवा देणाऱ्या खासगी रुग्णालयाकडे ओढा असतो. परंतु ग्रामीण भागात मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राधान्य दिले जाते. या इमारतीचे काम चार ते पाच महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याने हे काम गुणवत्ता पूर्ण व्हावे याकडे सर्वानी लक्ष द्यावे. कारण या इमारतीचा फायदा महिलांना होणार आहे. जिल्ह्यात कोविड लसीकरणात महिलांचा टक्का कमी असल्यााचे वर्तमानपत्रातून कळले असून, महिलांच्या लसीकरणाकडेही पुरुष वर्गाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगून तिसरी लाट थोपविण्यासाठी सर्वानी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन या वेळी केले. तसेच अजेपूर येथील उपसरंपच सजंय चौरे व माजी पंचायत समिती सदस्य दिलीप गावीत यांचा शंभर टक्के लसीकरण केल्याबद्दल अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आष्टे येथे ४० लाख रुपये खर्चाच्या प्रसूतीगृह विस्तारीकरण इमारतीचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST