शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नंदुरबार, नवापूर तालुक्यातील 167 गावांमध्ये भुजल अधिनियम लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तीव्र पाणी टंचाई असलेल्या नंदुरबार उपविभागातील 167 गावांमधील सार्वजनिक स्त्रोतातून पिण्याच्या पाण्याच्या उपयोगाव्यतिरिक्त उपसा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तीव्र पाणी टंचाई असलेल्या नंदुरबार उपविभागातील 167 गावांमधील सार्वजनिक स्त्रोतातून पिण्याच्या पाण्याच्या उपयोगाव्यतिरिक्त उपसा आढळल्यास संबधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रांताधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वान्मती सी. यांनी दिले. भुजल अधिनियमाद्वारे हे आदेश त्यांनी गुरुवारी काढले.नंदुरबार उपविभागातील नंदुरबार व नवापूर तालुक्यातील 167 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता येत्या काळात आहे. भुजल सव्रेक्षण आणि विकास यंत्रणेने तसा अहवाल देखील दिला आहे. त्यामुळे भुजल अधिनियम 1993 कलम चार नुसार संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गाव म्हणून 167 गावे घोषीत करण्यात आली आहेत. कलम पाच अन्वये सार्वजनिक स्त्रोतापासून एक कि.मी.च्या क्षेत्रात असलेल्या अन्य कोणत्याही स्त्रोतातून अवैध उपसा आढळून आल्यास संबधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही प्रातांधिकारी वान्मती सी. यांनी सांगितले.घोषीत करण्यात आलेल्या गावांमध्ये नंदुरबार तालुक्यातील आडछी, अजेपूर, अंबापूर, आष्टे, भोणे, बिलाडी, दुधाळे, फुलसरे, घोगळगाव, गुजरभवाली, गुजर जांभोली, करजकुपे, करणखेडा, कं्रढे, खामगाव, लोणखेडा, लोय, नळवे खुर्द, नळवे बुद्रूक, नांदर्खे, नारायणपूर, ओझर्दे, पथराई, पिंप्री, राकसवाडे, शिंदे, शिवपूर, विरचक, वेळावद, वासदरे, उमरगाव, उमर्दे बुद्रूक, टोकरतलाव, सुंदर्दे, वरूढ, वावद, विखरण, उमर्दे खुर्द, भालेर, सुजालपूर, शिंदगव्हाण, शिंदे, लहान शहादा, सावळदे, समशेरपूर, राकसवाडे, पातोंडा, पळाशी, नाशिंदे, नगाव, कोरीट, कोळदा, खोक्राळे, खोडसगाव, खापरखेडे, कठोरे, कानळदे, कलमाडी, काकर्दे, घुली, अक्राळे, बांमडोद, भालेर, बोराळे, चाकळे, चौपाळे, दहिंदुले खुर्द, दहिंदुले बुद्रूक, गंगापूर, मांडळ, रजाळे, सैताणे, वनकुटे, रनाळे, कार्ली, घोटाणे, आसाणे, बलदाणे, भादवड, बोराळे, ढंढाणे, आर्डीतारा, भांगडा, भवानीपाडा, देवपूर, ईसाईनगर, जळखे, कोठडे, कोठलीखुर्द, मंगरूळ, नंदपूर, मालपूर, नारायणपूर, नटावद, निंबोणी, निमगाव, वसलाई, वागशेपा, तारापूर या गावांचा समावेश आहे.नवापूर तालुक्यातील कामोद, वाघदे, वडफळी, तलावीपाडा, सोनपाडा, सागाळी, पिंपळे, पळसून, मौलीपाडा, नगारे, मोठे कडवान, चिखली, शिव्रे, बिलदा, अंजणे, कारेघाट, खोकरवाडा, लक्कडकोट, वाकीपाडा, वडकळंबी, उमरविहीर, रायपूर, प्रतापपूर, नवापाडा, नागङिारी, मोरथुवा, गंगापूर, भवरे, भांमरमाळ, बुधारफळी, बेडकीपाडा, बारीपाडा, बिलदा, चिरवे, खिकली, ढवळीपाडा, ढोंग, घोगळ, जामदे, केली, खैरवे, खडकी, खांडबारा, खातगाव, खोलविहिर, मालवन, मरोड, अंठीपाडा, मौलीपाडा, नगारे, नावली, शेगवे, सोनपाडा, झामणझर, बिलबारे, देवळीपाडा, दुधवे, खैरवे, कोकणीपाडा, मोरकारंजा, तारापाडा, उंमरडी, वडकुट, दापूर व वांझळे या गावांचा समावेश आहे. नंदुरबार व नवापूर तालुक्यात यंदा सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके आधीच दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत. आता दुष्काळी गावांमध्ये भुजल अधिनियम देखील लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी उपसा आणि वापर यावर मर्याद येणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.